Legends League 2 : सौरव गांगुली यांनी भारतीय संघाचे कर्णधारपद सोडून, निवृत्ती स्वीकारुन आता बरेच वर्ष लोटलाय. परंतु आता सौरव गांगुलीच्या चाहत्यांसाठी आनंदीची बातमी समोर येत आहे. भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याने एका क्रिकेट सामन्याचं आयोजन करण्यात आलं आहे. त्या मॅच मध्ये सौरव गांगुली भारतीय संघाच कर्णधारपद भुषवणार आहे. लीजेंड्स लीग क्रिकेटच्या दुसऱ्यासीजन मध्ये भारताची टीम इंडिया महाराजाचा सामना रेस्ट ऑफ द वर्ल्ड टीमशी होईल. 15 सप्टेंबरला इडन गार्डन्सवर हा सामना होणार आहे. ज्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआय समोर हा प्रस्ताव मांडला होता.
रेस्ट ऑफ द वर्ल्ड या मॅच मध्ये 10 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. या सामन्यानंतर दुसऱ्यादिवशी लीजेंड्स लीगची सुरुवात होईल. ज्यात 4 संघ खेळणार आहेत. लीगचा हा दुसरा सीजन आहे. यात 15 सामने खेळले जातील.
असा असणार लीजेंड्स लीग 2 भारतीय संघ
सौरव गांगुली (कॅप्टन), विरेंद्र सेहवाग, मोहम्मद कैफ, ए. बद्रीनाथ, प्रज्ञान ओझा, पार्थिव पटेल, युसूफ पठान, हरभजन सिंह, नमन ओझा, अशोक दिंडा, आरपी सिंह, अजय जडेजा, जोगिन्दर शर्मा, रीतिंदर सिंह सोढी आणि इरफान पठान