भारतीय खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी केली. भारताच्या खात्यात २५ सुवर्णपदक झळकावले. आशियाई स्पर्धेत भारताने 100 पदकांचे शतक मिळवले. भारताच्या खात्यात एकूण 25 सुवर्णपदक, 35 रौप्यपदक तर 40 कांस्य पदकांचा समावेश आहे.
भारतासाठी आज सर्वात मोठा आणि ऐतिहासिक दिवस आहे. भारताने आशियाई स्पर्धेत एक दोन नव्हे तर तब्बल 100 पदके जिंकली आहेत. एकापाठोपाठ एक पदकं जिंकत भारताने ही जोरदार कामगिरी केली आहे. यावेळी भारताने 25 सूवर्ण पदकांचीही लयलूट केली आहे. भारताच्या या ऐतिहासिक कामगिरीमुळे आशियाई स्पर्धेत भारताचा दबदबा वाढला आहे. आशियाई स्पर्धेत पदकांची लयलूट करण्याचं स्वप्न भारताने पाहिलं होतं. भारताचं हे स्वप्न पूर्ण झालं आहे.
आशिया स्पर्धेचा आज 14 वा दिवस आहे. या 14 दिवसातच भारताने मोठी कामगिरी करत एकूण 100 पदके जिंकली आहेत. यात 25 सूवर्ण, 35 रजत आणि 40 कांस्य पदकांचा समावेश आहे. भारताच्या ज्योती वेन्नम हिने तीरंदाजीत गोल्ड मेडल मिळवलं आहे. तर अदिती स्वामीने कंपाऊंड तीरंदाजीत कांस्य पदक जिंकलं आहे. या दोन पदकाच्या बळावर भारताच्या पदकांची संख्या 100 झाली आहे.