क्रीडा

Ind vs Aus WC Final 2023 LIVE Score; बुमराहने ऑस्ट्रेलियाला दिला तिसरा धक्का, ऑस्ट्रेलिया 47 धावा 3 बाद

आज आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनल सामना टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात झाली.

shweta walge

ऑस्ट्रेलियाचा जगज्जेतेपदाचा षटकार. सहाव्यांदा वर्ल्डकप जिंकण्याचा रेकॉर्ड. अहमदाबादमध्ये भारताला नमवून विश्वचषकावर कोरलं नाव'. ऑस्ट्रेलियाचा भारतावर सहा विकेट्सने विजय. भारताच्या पदरी निराशा. 

ट्राविस हेड याने 95 बॉलमध्ये 100 धावा केल्या असून या खेळीमध्ये त्याने 14 चौकार आणि 1 षटकार मारला आहे. शतक झाल्यावर जडेजाला पहिल्याच बॉलवर सिक्स मारला आहे.

ट्राविह हेड आणि लाबुशेन यांच्यात 101 धावांची नाबाद शतकी भागीदारी झाली आहे. एकंदरिक भारतीय संघाच्या हातातून सामना जायला लागल्याचं दिसत आहे.

बुमराहने ऑस्ट्रेलियाला दिला तिसरा धक्का, स्मिथ चार धावा काढून बाद. ऑस्ट्रेलिया 47 धावा 3 बाद 

ऑस्ट्रेलियाला दिला दुसरा धक्का देत जसप्रीत बुमराहने मिचेल मार्शला 15 धावांवर पाठवले तंबूत

ऑस्ट्रेलियाला पहिला धक्का, मोहम्मद शामीने डेविड वॉर्नरला पाठवले तंबूत, डेविड वॉर्नर 7 धावांवर आऊट

डेविड वॉर्नर आणि ट्रेविस यांनी शानदार सुरुवात केरत बुमराहच्या पहिल्याच षटकात ऑसीच्या सलामी फलंदाजांनी 15 धावा वसूल केल्या. वॉर्नरने 7 तर हेडने 8 धावा मारल्या

वॉर्नर आणि ट्रेविस हेड यांनी बुमराहच्या गोलंदाजीवर शानदार सुरुवात केली. दोन चेंडूत सात धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात भारतीय संघ 240 धावांत ऑलआऊट झाला आहे. कांगारू संघाने विजयासाठी 241 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. भारताकडून केएल राहुलने सर्वाधिक 66 आणि विराट कोहलीने 54 धावा केल्या. कर्णधार रोहित शर्माने 47 आणि सूर्यकुमार यादवने 18 धावा केल्या. कुलदीप यादवने 10 धावांचे योगदान दिले.

भारताला नववा धक्का, सूर्यकुमार यादव आऊट

 एकापोठापाठ एक विकेट फेकल्या जात आहे. केएल राहुल, शामीनंतर आता जसप्रीत बुमराह बाद झाला. बुमराहाला फक्त एक धाव काढता आली.

केएल राहुल अर्धशतकानंतर तंबूत परतला. त्या धक्क्यातून सावरत नाही, तोच मोहम्मद शामीही बाद झाला

भारताचा स्टार खेळाडू सुर्यकुमार यादव आता मैदानात आला असून त्याच्या बॅटींगकडे सर्वांच्या नजरा असणार आहेत. जडेजाने आजही निराशा केली असून अवघ्या 9 धावा करून आऊट झाला आहे.

भारताला पाचवा धक्का. रविंद्र जाडेजा 9 धावांवर तंबूत परतला. जडेजाला 36 व्या ओव्हरमध्ये हेजलवूडने त्याला 9 धावांवर आऊट केलं.

विराट कोहली आऊट झाल्यावर रविंद्र जडेजा मैदानात आला आहे. आता राहुल आणि जडेजा यांच्यावर मोठी जबाबदारी असणार आहे.

विराट कोहली 29व्या षटकात आऊट झाला आहे. त्याच्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर पॅट कमिन्सने त्याला क्लीन बोल्ड केले. कोहलीने 63 चेंडूत 54 धावा केल्या.

15 ओव्हरमध्ये भारताच्या 97 -3 धावा झाल्या असून विराट नाबाद 32 आणि के. एल. राहुल 9 धावांवर खेळत आहे.

विराट कोहली आणि केएल राहुल पुन्हा एकदा मैदानावर स्थिरावलेत. भारतीय संघाची धावसंख्या वाढवण्याचे काम या जोडीवरच असेल. भारतीय संघ तीन बाद  95 धावा.... विराट 31 तर राहुल 8 धावांवर खेळत आहेत. 

भारताला तिसरा धक्का. रोहितपाठोपाठ श्रेयस अय्यर 4 धावा काढून बाद झाला आहे. भारत तीन बाद 81 धावा

भारताला दुसरा धक्का बसलाय. रोहित शर्मा 47 धावा काढून बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलच्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या नादात रोहित शर्मा बाद झालाय. भारत 2 बाद 76 धावा

ओपनर शुबमन गिल मोठा फटका मारायच्या नादात कॅच आऊट झाला आहे. मिचेल स्टार्क याने 4 धावांवर त्याला आऊट केलं आहे. विराट कोहली मैदानात आला असून आता रोहित आणि विराट मैदानात आहेत.

चौथ्या ओव्हरमध्ये रोहितने हेजलवूडला सिक्स आणि चौकार मारत कांगारूंवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. भारताच्या 4 ओव्हरमध्ये 30 धावा झाल्या आहेत.

रोहित शर्मा याने दुसऱ्या ओव्हरमध्ये फटकेबाजी करायला सुरूवात केली आहे. रोहितने हेजलवूडला याला दुसऱ्या ओव्हरमध्ये दोन चौकार मारत दमदार सुरुवात केली आहे.

रोहित शर्मा आणि शुबमन गिल मैदानात उतरले असून ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क पहिली ओव्हर  टाकत आहे. रोहित त्याला कसा फेस करतो हे पाहावं लागणार आहे. कारण साखळी सामन्यात त्याला शून्यावर माघारी पाठवलं होतं.

वर्ल्ड कप 2023 चा अंतिम सामना आज अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.

ऑस्ट्रेलिया प्लेईंग इलेव्हन : Australia playing XI डेव्हिड वॉर्नर, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्हन स्मिथ, मार्नस लॅबुशेन, जोश इंग्लिस (विकेटकीपर), ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, अॅडम झाम्पा आणि जोश हेझलवुड.

टीम इंडियाचे शिलेदार : Team India playing XI रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (विकेटकिपर), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज.

आज आयसीसी वनडे वर्ल्ड कप 2023 फायनल सामना टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होत आहे. या सामन्याला दुपारी 2 वाजता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुरुवात झाली. ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला वर्ल्ड कप फायनल 2003 मध्ये पराभूत केलं होतं. त्यामुळे आता टीम इंडियाला 20 वर्षांनी भारतात कांगारुंवर मात करत 20 वर्षांपूर्वीचा वचपा घेण्याची संधी आहे. आपण या सामन्याबाबतची प्रत्येक अपडेट या लाईव्ह ब्लॉगच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी