Gautam Gambhir Latest News : गौतम गंभीर लवकरच टीम इंडियाच्या नव्या प्रशिक्षकपदीची धुरा सांभाळणार आहे. दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार, गंभीर टी-२० वर्ल्डकपनंतर प्रशिक्षक म्हणून टीम इंडियासोबत जोडला जाणार आहे. भारतीय नियामक मंडळाकडून लवकरच याबाबत घोषणा केली जाणार आहे. बीसीसीआयने गंभीरने ठेवलेल्या अटी मान्य केल्या आहेत. "गंभीरबाबत बीसीसीआयने त्यांचा निर्णय घेतला आहे. प्रशिक्षक म्हणून गंभीरची निवड झाली आहे. टी-२० वर्ल्डकपनंतर टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविडच्या जागेवर गंभीरची वर्णी लागणार आहे", अशी माहिती बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.
रिपोर्टनुसार, बीसीसीआयने गंभीरच्या अटी मान्य केल्या आहेत. गंभीर प्रशिक्षक म्हणून टीममध्ये सहभागी झाल्यावर नव्या स्पोर्ट्स स्टाफची निवड करणार आहे. तसच गंभीरला भारतीय संघात काही बदलही करायचे आहेत. बीसीसीआयने गंभीरच्या या सर्व अटी मान्य केल्या आहेत. जेव्हा रवी शास्त्री टीम इंडियाचे प्रशिक्षक होते, त्यावेळी विक्रम राठोड यांची फलंदाजी कोच म्हणून त्यांनीच नियुक्ती केली होती.
शास्त्री या पदावरून बाहेर झाल्यावर राहुल द्रविडने प्रशिक्षकपदाची जबाबदारी घेतली. त्यानंतरही विक्रम राठोड यांना फलंदाज कोच म्हणून संघात ठेवण्यात आलं होतं. द्रविडच्या कोचिंगमध्ये गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून पारस महाम्ब्रेला जबाबदारी देण्यात आली आहे. तर टी. दिलीप फिल्डिंग कोच म्हणून काम करत आहेत. अशातच आता गंबीर संघात समाविष्ट झाल्यावर या स्पोर्ट्स स्टाफला संघासोबत ठेवणार की नाही, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.