पहिल्या फेरीत विक्री न झालेल्या रिले रोसोचे नशीबही उघडले आहे. रोसोला पंजाब किंग्जने 8 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. स्टीव्ह स्मिथ आणि करुण नायर दुसऱ्या फेरीतही विकले गेले नाहीत. दुसरीकडे, आरसीबीने लॉकी फर्ग्युसनला 2 कोटी रुपयांना खरेदी केले आहे.
मनीष पांडेला कोलकाता नाईट रायडर्सने 50 लाख रुपयांना त्यांच्या संघात सामील केले आहे. मनीष पहिल्या फेरीत विकला गेला नाही.
ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज स्पेन्सर जॉन्सन बाबत दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात रंजक लढत झाली. अखेर गुजरातने स्पेन्सर जॉन्सनला १० कोटींना विकत घेतले. तर, झाय रिचर्डसनला दिल्ली कॅपिटल्सने 5 कोटी रुपयांना त्यांच्या संघात समाविष्ट केले आहे. तर मुस्तफिजुर रहमान 2 कोटींच्या मूळ किमतीत सीएसकेचा भाग बनला आहे.
यश दयालला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने 5 कोटींना विकत घेतले आहे. यश दयाल गेल्या मोसमात गुजरात टायटन्सचा भाग होता. रिंकू सिंगने अखेरच्या षटकात यशच्या चेंडूवर पाच षटकार ठोकले होते.
कुमार कुशाग्र यांनाही चांगली रक्कम मिळाली आहे. यष्टिरक्षक फलंदाज कुशाग्राला दिल्लीच्या संघाने 7.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. कुशग्राची मूळ किंमत 20 लाख रुपये होती.
टॉम कोहलर कॅडमोर (इंग्लंड) – ४० लाख, राजस्थान रॉयल्स
रिकी भुई (भारत) - 20 लाख, दिल्ली कॅपिटल्स
शाहरुख खानला गुजरात टायटन्सने ७.४० कोटी रुपयांना विकत घेतले आहे. शाहरुखची मूळ किंमत 40 लाख रुपये होती. दुसरीकडे, रमणदीप सिंगला कोलकाता नाईट रायडर्सने 20 लाख रुपयांच्या मूळ किमतीत खरेदी केले.
अनकॅप्ड खेळाडू समीर रिझवीलाही मोठी किंमत मिळाली आहे. समीरला चेन्नई सुपर किंग्जने 8.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. दुसरीकडे, आंगकृष्ण रघुवंशीला केकेआरने 20 लाख रुपयांना विकत घेतले.
शुभम दुबेला दिल्ली कॅपिटल्स आणि राजस्थान रॉयल्सने विकत घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले. अखेर शुभम दुबेला राजस्थान रॉयल्सने 5.80 कोटी रुपयांना विकत घेतले.
दिलशान मधुशंका याला मुंबईने 4.6 कोटी रुपयांत खरेदी केले.
हैदराबादने जयदेव उनादकटला 1.60 कोटी रुपयांत खरेदी केलं.
कोलकात्याने 24.75 कोटी रुपयांत मिचेल स्टार्कला खरेदी केलं आहे. कोलकाता आणि गुजरात या दोन संघामध्ये त्याच्यासाठी चुरस पाहायला मिळाली.
लखनौने शिवम मावी याला 6.4 कोटी रुपयात खरेदी केले. आरसीबी आणि लखनौ संघामध्ये शिवम मावीसाठी चुरस झाली.
उमेश यादवला गुजरातने 5 कोटी 80 लाख रुपयात खरेदी केले. उमेश यादवसाठी गुजरात आणि हैदाराबादमध्ये चुरस पाहायला मिळाली.
आरसीबीने 11.5 कोटी रुपयांत अल्जारी जोसेफला खरेदी केले. लखनौ आणि आरसीबी टीममध्ये त्याच्यासाठी चुरस पाहायला मिळाली.
50 लाख रुपयांत चेतन साकरिया याला कोलकात्याने घेतलं.
केएस भरत याला 50 लाख रुपयांत कोलकात्याने खरेदी केलं
50 लाख रुपयांच्या मूळ किंमतीमध्ये त्याला दिल्लीने खरेदी केलं आहे.
इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू ख्रिस वोक्सला पंजाबने 4.2 कोटी रुपयांत खरेदी केले.
न्यूझीलंडच्या अष्टपैलू डॅरेल मिचेलसाठी दिल्ली आणि पंजाबमध्ये चूरस पाहायला मिळाली. चेन्नईने अखेर 14 कोटी रुपयांत डॅरेल मिचेलला आपल्या टीममध्ये घेतले.
प्रिती झिंटाच्या पंजाबच्या टीममने हर्षल पटेलला 11 कोटी 75 लाख रुपयांत खरेदी केले. अष्टपैलू हर्षल पटेलसाठी गुजरात आणि पंजाबमध्ये चूरस पाहायला मिळाली.
आफ्रिकेचा गेराल्ड कोएत्जी मुंबईच्या इंडियन्सने 5 कोटी रुपयांत खरेदी केले.
पॅट कमिन्ससाठी चेन्नई आणि मुंबईमध्ये चूरस पाहायला मिळाली. त्यानंतर यामध्ये आरसीबीने भाग घेत चुरस वाढवली. अखेर हैदराबादने 20.5 कोटी रुपयात पॅट कमिन्सला आपल्या टीममध्ये घेतले.
अष्टपैलू शार्दूल ठाकूर चेन्नईच्या टीममध्ये. चेन्नईने शार्दूल ठाकूरला ४ कोटी रुपयात आपल्या ताफ्यात घेतले. चेन्नई आणि हैदाराबादमध्ये शार्दूल ठाकूरसाठी चूरस पाहायला मिळाली.
रचिन रविंद्र चेन्नईच्या टीममध्ये. रचिन रविंद्रसाठी दिल्ली आणि चेन्नईमध्ये चूरस झाली. 1 कोटी 80 लाख रुपयात रचिन रविंद्रला चेन्नईने खरेदी केले.
वानिंदू हसरंगाला हैदराबादने 1.5 कोटीमध्ये खरेदी केले.
मनिष पांडे अनसोल्ड राहिला आहे.
ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फलंदाज स्टिव्ह स्मिथ अनसोल्ड राहिला.
ट्रेविस हेडला 6 कोटी 80 लाख रुपयांत हैदराबादने खरेदी केले. हैदाराबाद आणि चेन्नईमध्ये ट्रेविस हेडसाठी चूरस लागली होती.
दिल्लीने चार कोटी रुपयांत हॅरी ब्रूकला खरेदी केले. हॅरी ब्रूकसाठी राजस्थान आणि दिल्ली संघामध्ये चूरस पाहायला मिळाली. हॅरी ब्रूकची खरी ही किंमत दोन कोटी रुपये इतकी होती.
दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज रिले रोसौ हा पहिला खेळाडू लिलावात अनसोल्ड राहिला.
कोलकाताने लावली पहिल्यांदाच रॉवमन पॉवेलवर बोली लावली आहे. रॉवमन पॉवेल याची प्राईज १ कोटी आहे. राजस्थानने 7 कोटी रुपयात रॉवमन पॉवेल याला आपल्या टीममध्ये घेतले. राजस्थान आणि कोलकातामध्ये पॉवेलसाठी चूरस लागली होती.