देशाला बॉक्सिंगमध्ये सुवर्णपदक जिंकून देणारे डिंको सिंह यांचे गुरुवारी निधन झाले. भारतात बॉक्सिंगची क्रांती करण्यात त्यांचा मोठा वाटा होता. त्यांच्या या निधनाने क्रीडा वर्तुळात शोक व्यक्त करण्यात येत आहे.तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय क्रीडा मंत्री किरन रिजीजू आहे, बॉक्सर विजेंदर सिंह आणि दिग्गज बॉक्सर मेरी कोमनेसह अनेक खेळाडूंनी डिंको त्यांना श्रद्धांजली दिली.
यकृत कर्करोगापासून डिंको बर्याच वर्षांपासून अनेक आरोग्य संबंधित समस्यांना लढा देत होते. 2017 पासून त्यांच्या कर्करोगावर उपचार सुरू होता. गेल्या वर्षी ते कोविड-19 पॉझिटिव्ह आढळले होते ज्याने यापूर्वी ते झगडत असलेल्या आरोग्याच्या आव्हानांमध्ये आणखी एक भर घातली. पण 41 वर्षीय सिंह यांनी कोरोनावरही मात केली. इम्फाल परत जाण्यापूर्वी जानेवारी 2020 मध्ये डिंको यांनी लिव्हर अँड बिलीअरी सायन्सेस (आयएलबीएस), दिल्ली येथे रेडिएशन थेरपी घेतली होती. त्यानंतर ते त्याच्या निवासस्थानी इन्फाळ येथे गेले होते.
आपल्या प्रदीर्घ कारकीर्दीत डिंको यांनी केवळ भारतासाठी पदकेच जिंकली नाहीत तर सहा वेळा विश्वविजेती मेरी कोम, सरिता देवी आणि विजेंदरसिंग यांच्यासह अनेक बॉक्सरच्या पिढीसाठी ते प्रेरणा बनले. डिंको सिंह भारतीय नौदलात नोकरीस होते आणि तब्येत बिघडण्यापूर्वी त्यांनी प्रशिक्षक म्हणूनही काम केले होते.
डिंको सिंह यांना १९९८ साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. २०१३ साली पद्मश्री पुरस्कार देऊन केंद्र सरकारने त्यांचा गौरव केला होता.