ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली भारतीय 'अ' संघ ऑस्ट्रेलिया 'अ' विरुद्ध दुसऱ्या अनौपचारिक कसोटी सामन्यासाठी मैदानात उतरला आहे. मेलबर्न क्रिकेट ग्राउंडच्या मैदानात रंगलेल्या या सामन्यात कॅप्टनसह केएल राहुल, अभिमन्यू ईश्वरन या खेळाडूंनी माघार घेतल्यामुळे भारतीय संघ अडचणीत सापडला होता. 64 धावांवरच संघ तंबूत माघारी परतल्याने ध्रुव जुरेलनं ऑस्ट्रेलियन मैदानात भारताची लाज राखल्याचं पहायला मिळालंय.
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर भारताचे 4 फलंदाज फक्त 11 धावांवर बाद होऊन तंबूत माघारी फिरले. यामध्ये अभिमन्यू ईश्वरन हा 00, साई सुदर्शन हा 00, तर लोकेश राहुल 04 आणि ऋतुराद गायकवाड 04 धावांवर माघारी फिरला. पण ध्रुव जुरेलने जरी ऑस्ट्रेलियाच्या मैदानात लाज राखली असेल तरी तो अर्धशतकापासून मात्र हुकला.
मात्र ध्रुव जुरेल एका बाजूने खिंड लढवत राहिला. पण 55 व्या षटकात नॅथन मॅक्स्वीनीच्या फिरकीवर उत्तुंग फटका मारण्याच्या तयारीत ध्रुवची विकेट पडली आणि त्यालाही पुन्हा तंबूत माघारी परतावं लागलं.