Commonwealth Games | hockey team lokshahi
क्रीडा

Commonwealth Games 2022 : हॉकीमध्ये भारताने कॅनडावर केली मात

भारत पदक यादीत सहाव्या स्थानावर

Published by : Team Lokshahi

Commonwealth Games 2022 : कॉमनवेल्थ गेम्स 2022 च्या सहाव्या दिवशी भारताने कॅनडाविरुद्ध शानदार प्रदर्शन करत पुरुष हॉकी जिंकली. टीम इंडियाने हा सामना 8-0 ने जिंकला. भारताकडून हरमनप्रीतने दोन गोल केले. तर अमित, ललित उपाध्याय, गुरजंत आणि मनदीप यांनी प्रत्येकी एक गोल केला. तर आकाशदीपने दोन गोल केले. (commonwealth games 2022 beat canada hockey)

मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली कॅनडाविरुद्धचा सामना खेळायला आलेल्या भारतीय संघाने पहिल्या क्वार्टरपासूनच दडपण कायम ठेवले. भारताने सातत्याने चांगली कामगिरी केली. उपकर्णधार हरमनप्रीतने संघासाठी दोन गोल केले. तर आकाशदीप सिंगनेही दोन गोल केले. याशिवाय ललित उपाध्यायने चमकदार कामगिरी करताना एक गोल केला. तर अमित रोहिदासने गोल केला.

हे लक्षात घेण्यासारखे आहे की, भारत पदक यादीत सहाव्या स्थानावर आहे. टीम इंडियाने 5 सुवर्णपदके जिंकली आहेत. 5 रौप्य आणि 4 कांस्य पदकेही जिंकली आहेत. कॉमनवेल्थ गेम्स 2022 मध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत सर्वाधिक पदके जिंकली आहेत. एकूण 106 पदके जिंकली आहेत. यामध्ये 42 सुवर्णपदक आणि 32-32 रौप्य आणि कांस्य पदकांचा समावेश आहे. तर इंग्लंड 86 पदकांसह दुसऱ्या स्थानावर आहे. न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. 26 पदके जिंकली आहेत.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी