आजपासून बुद्धिबळ ऑलिम्पियाड (Chess Olympiad Tournament) स्पर्धेला सुरूवात होत आहे. चेन्नईत या स्पर्धेला सुरूवात होईल. चेन्नईत गुरुवारपासून सुरू होणाऱ्या प्रतिष्ठेच्या बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेसाठी बुद्धिबळातील महासत्ता मानल्या जाणाऱ्या रशिया आणि चीनच्या अनुपस्थितीत खुल्या आणि महिला विभागांत भारताचे प्रत्येकी तीन संघ सज्ज झाले आहेत. ऑलिम्पियाडमधील खुल्या गटात विक्रमी १८८ आणि महिला गटात १६२ संघ सहभागी होणार आहेत. यजमान भारताला प्रत्येक गटात दोन संघ खेळवण्याची मुभा होती. याचप्रमाणे सहभागी संघांचा आकडा विषम झाल्यामुळे आणखी एकेक संघ खेळवायची संधी मिळाली.
अमेरिकेच्या संघात फॅबियानो करुआना, वेस्ली सो, लेव्हॉन अरोनियन, सॅम शँकलंड आणि लायनियर डॉिमगेझ यांच्यासारख्या नामांकित खेळाडूंचा समावेश आहे. त्यामुळेच अमेरिकेला जेतेपदाचा कडवा दावेदार मानला जात आहे. पाच वेळा विश्वविजेता विश्वनाथन आनंद यंदा ऑलिम्पियाडमध्ये खेळणार नाही आहे. ऑलिम्पियाडमधील खुल्या गटात विक्रमी १८८ आणि महिला गटात १६२ संघ सहभागी होणार आहेत. यजमान भारताला प्रत्येक गटात दोन संघ खेळवण्याची मुभा होती. याचप्रमाणे सहभागी संघांचा आकडा विषम झाल्यामुळे आणखी एकेक संघ खेळवायची संधी मिळाली. दोन ते चापर्यंतची मानांकने मिळालेल्या युक्रेन, जॉर्जिया आणि कझाकस्तानकडून कडवी लढत मिळू शकते. भारताचे अन्य दोन महिला संघसुद्धा आश्चर्यकारक कामगिरी बजावू शकतात.
महिला गट
’ ‘अ’ : कोनेरू हम्पी, डी. हरिका, आर. वैशाली, तानिया सचदेव, भक्ती कुलकर्णी.
’ ‘ब’ : वांटिका अगरवाल, सौम्या स्वामीनाथन, मेरी अॅन गोम्स, पद्मिनी राऊत, दिव्या देशमुख.
’ ‘क’ : इशा करवडे, साहिथी वर्षिनी, प्रत्युशा बोड्डा, पी. व्ही. नंधिधा, विश्वा वस्नावाला.
खुला गट
’ ‘अ’ : विदित गुजराथी, पी. हरिकृष्ण, अर्जुन इरिगसी, के. शशिकिरण, एसएल नारायणन.
’ ‘ब’ : डी. गुकेश, आर. प्रज्ञानंद, निहाल सरिन, रौनक साधवानी, बी. अधिबन.
’ ‘क’ : सूर्यशेखर गांगुली, एस. पी. सेतुरामन, अभिजित गुप्ता, कार्तिकेयन मुरली, अभिमन्यू पुराणिक.