Bhuvneshwar Kumar  team lokshahi
क्रीडा

IRE vs IND: भुवनेश्वर कुमारने मोडला विश्वविक्रम

भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने मोडला विश्वविक्रम

Published by : Shubham Tate

bhuvneshwar kumar : जागतिक क्रिकेटमध्ये सर्वात वेगवान चेंडू टाकण्याचा विक्रम पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरच्या नावावर आहे. २००३ च्या विश्वचषकात या गोलंदाजाने इंग्लंडविरुद्ध १६१.३ किमी प्रतितास वेगाने चेंडू टाकला होता. (bhuvneshwar kumar broke shoaib akhtar world record bowled)

जास्त वेगाने गोलंदाजी करण्यासाठी, एकतर गोलंदाजाला पूर्ण ताकद लावावी लागेल किंवा तांत्रिक बिघाडामुळे हा विक्रम मोडीत निघू शकतो. असाच काहीसा प्रकार भारत आणि आयर्लंड यांच्यात खेळल्या गेलेल्या पहिल्या T20 सामन्यादरम्यान घडला. भुवनेश्वर कुमारने एक नाही तर दोन चेंडू 200 किमी प्रतितास पेक्षा जास्त वेगाने टाकले. मात्र, तांत्रिक अडचणींमुळे हा रेकॉर्ड चुकीचा ठरणार नाही.

डावाच्या पहिल्या षटकाचा दुसरा चेंडू २०१ किमी प्रति तास तर तिसरा चेंडू २०८ किमी प्रति तास वेगाने नोंदविला गेला. टीव्हीवर स्पीड गनने दाखवलेले हे दृश्य पाहून सगळेच हैराण झाले. तांत्रिक बिघाडामुळे चाहत्यांनी सोशल मीडियावर त्यांची खिल्ली उडवली. हसन अली 219 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करू शकतो, तर भुवनेश्वर कुमार 201 किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी का करू शकत नाही, असे एका चाहत्याने म्हटले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी