पुढील महिन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीपचा अंतिम सामना खेळवला जाणार आहे. मात्र, या फायनलआधी भारतीय संघाला मोठा धक्का बसला. आरसीबीविरोधातील सामन्यादरम्यान केएल राहुल दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे तो वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीपच्या फायनलमधून बाहेर पडला आहे. परंतु, आता केएल राहुलच्या जागी ईशान किशन याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पनशीपच्या फायनलमध्ये खेळण्याची संधी दिली आहे. बीसीसीआयने आज याबाबत अधिकृत माहिती दिली आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना लंडनच्या 'द ओव्हल' येथे खेळवला जाणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघात हा सामना पार पडेल. 7 जून ते 11 जूनपर्यंत सामना खेळवला जाईल. आता या दोन्ही संघापैकी सामना कोण जिंकेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
असा असेल भारतीय संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा , विराट कोहली, अजिंक्य रहाणे , केएस भरत (विकेटकिपर), आर अश्विन, अक्षर पटले, शार्दुल ठाकूर, मोहम्द शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट, इशान किशन (विकेटकिपर)
Standby players: ऋतुराज गायकवाड, मुकेश कुमार, सूर्यकुमार.
असा असेल ऑस्ट्रलियाचा संघ
पॅट कमिन्स (कर्णधार), स्टीव्ह स्मिथ (उप कर्णधार), स्कॉट बोलँड, ॲलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस हॅरिस, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लायन , मिचेल मार्श, टॉड मर्फी, मॅथ्यू रेनशॉ, मिचेल स्टार्क, डेव्हिड वॉर्नर.