नवी दिल्ली : कुस्ती महासंघाच्या (WFI) अध्यक्षपदी भाजप खासदार ब्रिजभूषण सिंह यांचे निकटवर्तीय संजय सिंह यांची निवड झाली आहे. यावरून पुन्हा मोठा वाद निर्माण झाला आहे. याविरोधात साक्षी मलिकने कुस्तीतून निवृत्ती जाहीर केली आहे. तर, बजरंगी पुनिया यानेही पद्मश्री पुरस्कार सरकारला परत घेण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहीले आहे.
बजरंग पुनिया म्हणाला की, बेटी बचाओ बेटी पढाओच्या ब्रँड अॅम्बेसेडर बनणाऱ्या मुलींना अशा स्थितीत टाकण्यात आले की त्यांना त्यांच्या खेळातून माघार घ्यावी लागली. आम्ही पैलवानांसाठी काही करू शकलो नाही. महिला कुस्तीपटूंचा अपमान केल्यानंतर मी माझे आयुष्य 'सन्माननीय' म्हणून जगू शकणार नाही. ही गोष्ट मला आयुष्यभर त्रास देत आहे. म्हणूनच हा 'सन्मान' मी तुम्हाला परत करत आहे, असे त्याने म्हंटले आहे.
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, क्रीडा मंत्रालयाने WFI निवडणुका निष्पक्ष आणि लोकशाही पद्धतीने पार पडल्या. बजरंग पुनियाला पद्मश्री परत करण्याचा निर्णय बदलण्यासाठी आम्ही अजूनही प्रयत्न करू, असे क्रीडा मंत्रालयाने म्हटले आहे.