आसामची पहिली महिला बॉक्सर म्हणून पुढे आलेली लवलिना बोरगोहेन आगामी टोकीओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलीय आहे. या बातमीनंतर आसामसह क्रीडा विश्वात तिचे कौतुक होत आहे.
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी या संदर्भात ट्वीट केले आहे. ते ट्वीटमध्ये म्हणतात, आसामची पहिली महिला बॉक्सर लवलिना बोरगोहेन ही टोकीओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरली आहे. तुला अभिनंदन अशीच कामगिरी कर आणि यशस्वी हो, अशा शुभेच्छा त्यांनी यावेळी दिल्या आहेत.
अवघ्या 23 वर्षाच्या असलेल्या लवलिना बोरगोहेन हिने अनेक स्पर्धा गाजवल्या आहेत. ती दोन वेळा कांस्य पदक विश्वविजेते ठरली आहे. त्यात आता ती आसाममधली पहिली महिला बॉक्सर ठरलीय जी टोकीओ ऑलिम्पिकसाठी पात्र आहे. त्यामुळे तिच्या कामगिरीकडे आता संपूर्ण भारताचे लक्ष लागले आहे.