आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझवर अटक करण्यात आली होती. कॉर्डेलिया क्रूझवर पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. ही क्रूझ मुंबई ते गोवा प्रवास करणार होती. पंरतु यावर ड्रग्ज पार्टी होणार असल्याची माहिती एनसीबी अधिकारी समीर वानखेडे आणि त्यांच्या टीमला होती. यामुळे वानखेडेंनी छापेमारी केली. छापेमारीमध्ये आर्यन खान, मुनमुन धमेचा आणि अरबाझ मर्चंटला अटक करण्यात आली होती. यांच्याकडे ड्रग्ज सापडले असल्याचा आरोप एनसीबीकडून करण्यात आलं होता.
एनसीबीने आर्यन खानसह एकूण १७ जणांना अटक केली होती. तपासादरम्यान काही जणांना चौकशी करुन सोडण्यात आले होते. तसेच आर्यन खान आणि त्याचा मित्र अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचाला अटक करुन न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. कोर्टात आर्यनकडे ड्रग्ज सापडले असून त्याचा आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटशी संबंध असल्याचा युक्तिवाद एनसीबीकडून करण्यात आला होता. आर्यनचा फोन जप्त करण्यात आला होता. तसेच ड्रग्ज संबंधी चॅट करण्यात आली असल्याचाही दावा करण्यात आला होता. परंतु एनसीबीच्या एसआयटीने हा दावा फेटाळून लावला आहे.
एसआयटीच्या चौकशीमध्ये मोठा खुलासा
आर्यन खानकडे कधीच ड्रग्ज नव्हते त्यामुळे त्याचा फोन घेऊन त्याच्या चॅट तपासण्याची गरज नव्हती. चॅट्स असे सुचवत नाहीत की आर्यन खान कोणत्याही आंतरराष्ट्रीय सिंडिकेटचा भाग होता. NCB ने छापा व्हिडिओ-रेकॉर्ड केलेला नव्हता आणि गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या अनेक आरोपींकडून जप्त केलेले ड्रग्ज सिंगल रिकव्हरी म्हणून दाखवले आहेत. NCB ने क्रूझवरुन १३ ग्रॅम कोकेन, पाच ग्रॅम मेफेड्रोन, २१ ग्रॅम गांजा, MDMA च्या २२ गोळ्या आणि १.३३ लाख रोख जप्त केले.
आर्यन खानने त्याचा मित्र अरबाज मर्चंटला क्रूझवर ड्रग्ज आणण्यास सांगितले नाही. असेही तपासामध्ये स्पष्ट झाले आहे. आर्यन खानने मोबाईलमध्ये गांजा आणि ड्रग्ज संबंधी चॅट केले असल्याचा दावा करण्यात येत होता. परंतु त्याने असे चॅट केले नाही. आर्यन खानने ड्रग्ज सेवन केले असेल तर त्याला काय शिक्षा होऊ शकते याबाबत अद्याप स्पष्ट माहिती देण्यात आली नाही. परंतु एनसीबीच्या एसआयटी पथकाची चौकशी पूर्ण झाली नाही. यामध्ये माजी एनसीबी अधिकारी समीर वानखेडे ज्यांची आता बदली करण्यात आली आहे. त्यांचीही चौकशी करण्यात आली आहे. तसेच या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या साक्षीदारांचीसुद्धा एसआयटीने चौकशी केली आहे. दरम्यान मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती नितीन डब्लू सांबरे यांच्या एकल खंडपीठाने नमूद केले की कोणत्याही षड्यंत्राचे अस्तित्व सूचित करणारे कोणतेही पुरावे नाहीत. तसेच चॅटआधारे आर्यन खान, अरबाझ मर्चंट आणि मुनमुन धमेचा यांच्यावर आरोप करु शकत नाही आणि ते एकत्र प्रवास करत असल्याने या ड्रग्ज प्रकरणातील आयोजनाचा भाग म्हणता येणार नाही