पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वैयक्तिक ट्विटर अकाऊंट हॅक करण्यात आले आहे (PM Modi Twitter Account Hack). रविवारी पहाटे पंतप्रधान कार्यालयाने ही माहिती दिली. खरं तर, पंतप्रधान मोदींचे ट्विटर हँडल हॅक करून 'भारताने बिटकॉइनला अधिकृतपणे कायदेशीर मान्यता दिली आहे' असा दावा करत ट्विट केले होते. हे ट्विट काढून टाकण्यात आले असून पंतप्रधानांचे खाते सुरक्षित करण्यात आले आहे.
पंतप्रधान कार्यालयाने (PMO) आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ट्विटर हँडलशी छेडछाड करण्यात आली आहे. हे प्रकरण ट्विटरकडे देण्यात आले आहे आणि अकाऊंट तात्काळ सुरक्षित करण्यात आले आहे.