देशात कोरोना पसरवण्याचे काम महाराष्ट्र काँग्रेस आणि दिल्लीतील 'आप' करत आहेत. यांनी गलिच्छ राजकारण देखिल केले आहे. अशी जोरदार टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत केली आहे. या पक्षांनी राज्यांतून आलेल्या लोकांना त्यांच्या राज्यात परत जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं त्यामुळे कोरोनाचा हाहाकार झाला. याशिवाय त्यांनी काँग्रेसवर चांगलेच टीकास्त्र सोडलं होतं.
या पार्श्वभूमीवर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या २ दिवसंपासून संसदेत ज्या भाषेत आणि जशा देहबोलीत बोलत आहेत, ते अत्यंत खालच्या दर्जाचं आहे. पंतप्रधान पदावर बसलेल्या व्यक्तीने अशा भाषेत अशा देहबोलीसह बोलणं शोभत नाही. या देशाला इतिहास आहे. हा इतिहास तोडण्याची मोडण्याची गरज नाही. पंतप्रधान मोदींना संघाच्या शाखेत जे शिकवलं जातं तेवढाच इतिहास माहिती आहे. त्यांनी व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचं कुलगुरू होऊ नये." पंतप्रधान मोदी जे जे बोलत आहेत ते द्वेषापोटी बोलत आहेत. त्यांच्या देहबोलीतून हे दिसून येतं. ते अत्यंत नैराश्यात गेले आहेत,"
"मोदींना फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवायची आहे. निवडणूक जिंकण्यासाठी ते कितीही खालच्या दर्जावर गेले तरी त्यांना आणि त्यांच्या पक्षाला ते चालतं. या सगळ्या गोष्टीचा मी निषेध करते, असे यशोमती ठाकूर म्हणाल्या.