भारतीय औषध नियंत्रक मंडळाने मुलांसाठी देखील लसीकरणाला मान्यता दिली आहे. भारत सरकारने २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांसाठी कोव्हॅक्सिनचा आपत्कालीन वापर करण्यास मान्यता दिली आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिन ही देशातील पहिली लस बनली आहे जी मुलांना आपत्कालीन वापरासाठी मंजूर करण्यात आली आहे.
केंद्र सरकार लवकरच २ ते १८ वर्षांच्या मुलांच्या लसीकरणासाठी मार्गदर्शक तत्त्वेही जारी करेल. मुलांवर लसीकरणासाठी मान्यता मिळण्यापूर्वी कोव्हॅक्सिनला दीर्घकाळ चाचणी करावी लागली. भारत बायोटेकने १८ वर्षाखालील मुलांवर तीन टप्प्यात चाचणी पूर्ण केली. दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या सप्टेंबरमध्ये पूर्ण झाल्या. यानंतर भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला मान्यता देण्यात आली आहे.