sugarcane  Team Lokshahi
इतर

उसाचा रस पितांना ही काळजी घ्या, अन्यथा उसाचा रस पिणे पडेल महागात

Published by : Akash Kukade

उसाचा रस (sugarcane)उन्हाळ्यात खूप फायदेशीर असतो, पण जेव्हाही तुम्ही कोणत्याही उसाच्या रसाच्या (sugarcane)दुकानात रस पितात तेव्हा दुकानदार उसाच्या रसात भरपूर बर्फ टाकतात. ऊस आणि बर्फामध्ये खूप फरक आहे, ज्यामुळे आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. पुढच्या वेळी बाहेर कुठेतरी उसाचा रस प्यायला तर दुकानदाराला बर्फ टाकायला नकार द्या.

उसाचा रस पिण्यापूर्वी तुम्ही ज्या ठिकाणी रस पीत आहात तेथील दुकानदाराने यंत्र आणि ऊस व्यवस्थित स्वच्छ केला आहे की नाही हे तपासा. कारण उसामध्ये घातक बुरशी असते. तसेच उसामध्ये भरपूर माती आहे. जर दुकानदाराने तुम्हाला उसाचा रस मातीत मिसळून दिला तर तुम्हाला मातीतील अमिबियासिस आणि आमांश सारखे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.

यासोबत लाल रंगाचा उसाचा रस चुकूनही पिऊ नका. असा उसाचा रस तुमचे आरोग्य बिघडू शकतो. लाल रंगाचा उसाचा रस प्यायल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात. लाल रंगाचा उसाचा रस प्यायल्याने लाल कुजाचा रोग होण्याची शक्यता असते.

ही बुरशी आहे, त्यामुळे उसावर लाल रंग दिसून येतो. असा उसाचा रस प्यायल्याने हिपॅटायटीस ए, डायरिया आणि पोटाचे घातक व प्राणघातक आजार होऊ शकतात.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी