रोजरोज तेच जेवण जेवून कंटाळा येतो? प्रत्येकाच्या घरी जेवणासाठी डाळीचे दोन प्रकार ठरलेले असतात. त्यात तिखट डाळ आणि गोडी डाळ हे दोनचं प्रकार डाळीचे खाऊन कंटाळा येण सहाजिक आहे. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय जेवणात एक रुचकर चव येणारी चिंचगुळाची आमटी एकदा करून पाहाच...
चिंचगुळाच्या आमटीसाठी लागणारे साहित्य:
तुरीची डाळ
कढिलिंबाची पाने
मसाला
गुळ
चिंचेचा कोळ
तिखट
कोथिंबिर
ओलं खोबरं
तेल
मोहरी
हिंग
हळद
चिंचगुळाची आमटी बनवण्याची कृती:
सर्वात आधी तुरीची डाळ भिजत घाला ति छान धुवून घ्या. त्यानंतर तुरीची डाळ शिजवण्यासाठी ठेवा आणि त्यात हिंग, हळद आणि तेल घाला. यानंतर गरम पाण्यात चिंच घालून कोळून घ्यावी आणि उरलेला चोथा टाकून द्यावा. यानंतर त्यात गुळ, तिखट, मीठ, गोडा मसाला घालून घ्यावा. यानंतर एका कढईत फोडणीसाठी तेल घालून त्यात मोहरी, हिंग, कढिलिंबा आणि हळद घाला.
तयार केलेली फोटणी शिजवलेल्या तुरीच्या डाळिवर ओता आणि वरून कोथिंबीर घाला. यानंतर त्यात थोडे पाणी घालून डाळीला उकळावा. डाळीला उकळी आल्यानंतर डाळीवरून ओलं खोबरं घालून घ्यावं आणि थोडावेळ मंद आचेवर डाळ शिजवत ठेवा अशाप्रकारे जेवणात रुचकर चव आणणारी चिंचगुळाची आमटी तयार होईल या डाळीचा आनंद तुम्ही रात्री सहकुटुंब घेऊ शकता.