ताडगोळे हे उन्हाळ्यांत येणार अतिशय मऊ आणि रसदार फळ आहे. ताडगोळे चवीला गोड असून प्रकृतीला थंड असतात. हे एक पाणीदार फळ असल्यामुळं ते कापायची गरज नासते. ताडगोळे उन्हाळ्यात खाल्ल्यास त्याचा आरोग्याला फायदा होतो.
साहित्य :-
१. ताडगोळे - ४ ते ५
२. लिंबाचा रस - १ लिंबाचा रस काढून घ्यावा.
३. काळ मीठ - १/२ टेबलस्पून
४. पाणी - अर्धा लिटर
कृती :-
१. सर्वप्रथम ताडगोळ्यांच्या वरची साल काढून घ्या.
२. या ताडगोळ्यांचे लहान लहान तुकडे करुन घ्या.
३. ताडगोळ्यांचे तुकडे एका बाऊलमध्ये घेऊन त्यात एका संपूर्ण लिंबाचा रस मिक्स करा.
४. आता या मिश्रणात काळ मीठ चवीनुसार घाला.
५. त्यानंतर यात अर्धा लिटर पाणी ओतून घ्या.
६. आणखी चव वाडवण्यासाठी एका ताडगोळ्याला कुचकरून टाका
ताडगोळ्याचे थंडगार सरबत पिण्यासाठी तयार होईल. हे सरबत एका बाटलीमध्ये भरुन फ्रिजमध्ये स्टोअर देखील करुन ठेवू शकता.