चांगली कामे करण्यासाठी, नव्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी काही दिवस शुभ मानले जातात. गुरुपुष्यामृत योग हा त्यापैकीच एक. अनेकांनी गुरुपुष्यामृत योग 2022 (Gurupushyamrut Yoga ) हा नक्कीच कॅलेंडरमध्ये वाचला असेल. या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते हे अनेकांना माहीत असेल. पण गुरुपुष्यामृत योग म्हणजे काय (Gurupushyamrut Yoga Chi Mahiti), गुरुपुष्यामृत योगाचे महत्व (Gurupushyamrut Yoga In Marathi) जाणून घेणेही गरजेचे असते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले की, त्या दिवशी ‘गुरुपुष्यामृत योग’ होतो. अनेक चांगल्या कामांसाठी हा दिवस शुभ मानला जातो. तर काही गोष्टींसाठी हा दिवस अशुभ मानला जातो. जाणून घेऊया गुरुपुष्यामृत योगाचे महत्व. गुरुपुष्यामृत योग आज 28 जुलैला येत आहे. हा योग शुभ मानला जातो आणि या दिवशी शुभं कामं केली जातात. यंदा गुरुपुष्यामृत योग आणि आषाढ अमावस्या म्हणजेच दीप अमावस्या एकाच दिवशी आले आहेत आणि त्यामुळे या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे.
गुरुपुष्यामृत या शब्दाची फोड केल्यानंतर गुरु आणि पुष्य असा होतो. पुष्य याचा अर्थ अधिक उर्जा आणि बळ देणारा असा आहे. त्यामुळेच हा दिवस फारच खास आहे. अनेक ठिकाणी गुरुपुष्यामृत योगाचे कॅलेंडर खास लावले जाते. विशेषत: सोन्याच्या दुकानात या दिवशी खरेदीचा वेग जास्त असतो. प्रत्येक जण त्याला परवडेल इतके सोने या दिवशी खरेदी करते. त्यामुळे त्यात वाढ होते अशी प्रत्येकाची धारणा आहे.
ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचे खास महत्त्व आहे. गुरुपुष्यामृत योग हा दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. गुरुपुष्यामृत योग आज 28 जुलैला येत आहे. हा योग शुभ मानला जातो आणि या दिवशी शुभं कामं केली जातात. या योगावर दागिने खरेदी, घराच्या बांधकामाला सुरवात केली जाते. हिंदू पंचांगानुसार गुरुपुष्यामृतयोग आज सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरु होईल आणि उद्या सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत असेल.