इतर

Gatari 2022 Special Non- veg Recipe: गटारी निमित्त घरच्या घरी बनवा 'या' झणझणीत नॉनव्हेज रेसिपी

श्रावण महीना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या महिन्याची सुरुवात होण्याआधी येते ती 'आषाढी अमावस्या' (Ashadhi Amavasya) ज्याला अलीकडे 'गटारी अमावस्या' (Gatari Amavasya) असे ही म्हटले जाते. या दिवशी घराघरात नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात आणि त्यावर ताव मारला जातो. कारण या दिवसानंतर संपूर्ण श्रावण महीना मांसाहार खाता येत नाही. यंदा २९ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

श्रावण महीना अवघ्या काही दिवसांवर आला आहे. या महिन्याची सुरुवात होण्याआधी येते ती 'आषाढी अमावस्या' (Ashadhi Amavasya) ज्याला अलीकडे 'गटारी अमावस्या' (Gatari Amavasya) असे ही म्हटले जाते. या दिवशी घराघरात नॉनव्हेज पदार्थ बनवले जातात आणि त्यावर ताव मारला जातो. कारण या दिवसानंतर संपूर्ण श्रावण महीना मांसाहार खाता येत नाही. यंदा २९ जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात होणार आहे.

का साजरी केले जाते गटारी

आषाढ महिना संपला की श्रावण महिन्याला सुरूवात होते. श्रावण महिना म्हणजे सण समारंभाचा महिना. या महिन्यात नॉनव्हेज खाल्ले जात नाही. त्यामुळे आषाढ महिन्याच्या अखेरच्या दिवशी समस्त नॉनव्हेज प्रेमी मटण, चिकन, नॉनव्हेज खातात. या दिवशी विविध हॉटेलमध्येही नॉनव्हेजप्रेमींची गर्दी असते. मात्र कोरोनामुले हॉटेल्स बंद असल्याने यंदाची ही गटारी लोकांना घरीच साजरी करावी लागणार आहे. गटारीच्या दिवशी खाद्यप्रेमी मटण, चिकन, मच्छीचा बेत करतात. कारण त्यानंतर त्यांना महिनाभर नॉनव्हेज खायला मिळणार नसते. महाराष्ट्रात ही गटारी साजरी केली जाते. या दिवशी अनेक घरांमध्ये हमखास चिकन, मटणाचा बेत असतोच.

'या' नॉन रेसीपी बनवा

कोंबडीवडे

कोंबडीवडे बनवण्याचे साहित्य -

एक किलो तांदूळ

धणे ३ चमचे

एक चमचा मेथी

चण्याची डाळ एक वाटी

उडदाची डाळ एक वाटी

बडिशेप १ चमचा

कोंबडी वडे बनवण्यासाठी तांदूळ स्वच्छ धुवून पीठ दळून आणा. चण्याची डाळ, उडदाची डाळ भिजत घाला आणि बारीक वाटून घ्या. वडे बनवण्यासाठी तांदळाच्या पिठात या दळलेल्या डाळी, धणेपूड, बडिशेप, मीठ एकत्र करा. हे पीठ भिजवताना कोमट पाण्याचा वापर करा. दरम्यान, या पिठात एक कांदा बारीक करून घाला. यामुळे वड्यांना चांगली चव येईल. पीठ मळून झाल्यानंतर एक ते दीड तास पीठ तसेच ठेवा. यामुळे पीठ चांगले फुलून येईल. यामुळे वडे चांगले खुसखुशीत होतील. वडे थापण्यासाठी तुम्ही केळीचे पान वापरू शकता अथवा प्लास्टिकचा तुकडा. याला तेल लावा आणि पिठाचा छोटा गोळा घेऊन तो तेलावर थापा. हे वडे गरम तेलात तळून घ्या. चिकनच्या रस्स्यासोबत हे वडे चविष्ट लागतात.

हिरव्या मसाल्यातील चिकन

साहित्य :

१ किलो कोंबडी (चिकन), १०-१२ लसूण पाकळ्या, ५-६ हिरव्या मिरच्या, १ वाटी सुके खोबरे किसलेले, अर्धी वाटी कोथिंबीर, १ मोठा चमचा खसखस, ५ लवंगा, २ दालचिनी तुकडे, १०-१२ मिरी, १ चमचा हळद, १ मोठा चमचा गरम मसाला, अर्धी वाटी तूप, मीठ चवीनुसार.

कृती :

अख्खा गरम मसाला भाजून घ्या. सुके खोबरे भाजून घ्या. नंतर त्यात लसूण-मिरची, थोडी कोथिंबीर टाकून वाटण चांगले बारीक वाटून घ्या. चिकनला वाटण लावून अर्धा तास ठेवा. कढईत तूप गरम करा. त्यात ४-५ लसूण पाकळ्या टाका. नंतर त्यात हळद व वाटण लावून ठेवलेले चिकन टाका व मीठ टाकून चांगले शिजवा. शिजल्यानंतर त्यात गरम मसाला व कोथिंबीर टाका.

चिकन करी

चिकन – पाव किलो

३ कांदे

८-१० लसणाच्या पाकळ्या

१/२ इंच आलं

३ मोठे चमचे सुकं खोबरं

प्रत्येकी २/३ लवंगा

काळी मिरी

१/२ इंच दालचिनीचा तुकडा

२ चमचे गरम मसाला

२ चमचे लाल तिखट

२ चमचे काजुची पेस्ट

१ लहान टोमॅटो

जीरे, तेल, हळद, मीठ – अंदाजाने

आवडीनुसार कोथिंबीर

वाटण तयार करण्यासाठी

पॅनमध्ये अगदी थोडं तेल घालुन लवंगा, काळी मिरी, दालचिनीचा तुकडा टाकुन परतुन घ्या. त्याच पॅनमध्ये आधीचा खडा मसाला न काढता कापलेल्या कांदयाच्या २/३ कांदा परतुन घ्यावा. कांदा ब्राऊन कलरचा झाला की त्यात सुकं खोबरं, ४-५ लसणीच्या पाकळ्या, आलं बारीक तुकडे करुन सगळं ब्राऊन होईपर्यंत परतुन घ्या. हे सगळ गार झालं की लागेल तसं पाणी टाकुन मिक्सरमधुन बारीक वाटण करुन घ्या.

चिकन बनवण्याची कृती

चिकन स्वच्छ धुवुन घ्यावं. नंतर कुकरमध्ये २ चमचे तेल टाकून ते गरम झाल्यावर जीरं टाकावं. त्यात ४-५ लसणीच्या पाकळ्या बारीक चिरुन घालाव्यात. लसूण थोडा परतला की कापलेल्या कांद्याच्या अर्धा कांदा टाकुन परतावं. टोमॅटो हवा असेल तर कांदा परतला गेला की त्यात घालुन परतावं. थोडी हळद, १/२ चमचा लाल तिखट घालुन मिनिट्भर परतावं. मग त्यात धुतलेलं चिकन घालुन ते थोडे परतावं. त्यात अगदी थोडं मीठ घाला.

नंतर कुकरचं झाकण लावुन ३ शिट्ट्या होऊ द्याव्या. कुकर गार झाल्यावर चिकन शिजलेलं असेल आणि त्यात सुप पण तयार झालं असेल. आता कढईमध्ये २-३ मोठे डाव तेल घालुन गरम झाल्यावर जीरे घाला. नंतर वाटण घाला. हे वाटण तेलात खुप चांगलं परतुन घ्या. साधारण १२-१५ मिनिटं तरी परता. मग त्यात काजुची पेस्ट, लाल तिखट, गरम मसाला, हळद घालुन अजुन १-२ मिनिटं परतुन घ्या. त्यानंतर कुकर मधलं चिकन आणि सुप घाला. करी किती घट्ट किंवा पातळ हवी त्याप्रमाणात पाणी घाला. चवीप्रमाणे मीठ घाला, एक उकळी आली की चवीप्रमाणे कोथिंबीर घाला.

सुकं मटण

साहित्य :

अर्धा किलो मटण, १ चमचा हळद, बारीक चिरलेला १ कांदा, किसून तळून वाटलेलं अर्धी वाटी सुकं खोबरं, अर्धा मोठा चमचा आलं लसणाचं वाटण, २ मोठे चमचे लाल तिखट (४ लवंगा, ३ दालचिनी तुकडे, २ वेलदोडे, ५ मिरी, २ चमचे जिरे आणि धणे तव्यावर भाजून त्याची कुटून पूड करा), तेल अर्धी वाटी.

कृती :

मटणाला हळद, मीठ, तिखट, धणे-जिरे पूड, आलं लसूण वाटण लावून शिजवा. कढईत तेल घ्या. त्यात चिरलेला कांदा टाकून परता. त्यात खोबरं कांदा वाटून टाका. कुटलेला गरम मसाला पूड टाकून परता व शिजलेले मटण टाका, वरून लाल तिखटही टाका.

मटण चॉप्स फ्राय

साहित्य

१ किलो मटण चॉप्स, २ चमचे आलं-लसूण पेस्ट, २ चमचे मिरची-कोथिंबीर पेस्ट, २ चमचे गरम मसाला, १ चमचा हळद, २ अंडी, अर्धा कप ब्रेडचा चुरा, चवीपुरतं मीठ, तळण्यासाठी तेल.

कृती :

मटण चॉप्सला हळद-मीठ लावून थोडासा पाण्याचा हबकारा मारून कुकरमध्ये शिजवून घ्या. ३ शिट्टय़ा होऊ द्या. आता आलं-लसूण, मिरची कोथिंबीर, गरम मसाला एकत्र करून हे मिश्रण शिजलेल्या मटण चॉप्सना लावून घ्या आणि ते अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवा. आता एका भांडय़ात अंडी फेटून घ्या. एका भांडय़ात ब्रेडचा चुरा ठेवा. तळण्यासाठी तेल गरम करा. मसाला लावलेले मटण चॉप्स अंडय़ात बुडवून आणि ब्रेडच्या चुऱ्यात घोळवून घ्या. मस्तपैकी तळून घ्या. मटण चॉप्स फ्राय तयार आहेत.

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी

Eknath Shinde Will be next CM? एकनाथ शिंदे यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपद?

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे