जर तुम्ही पावडर (Powder) वापरत असाल तर त्यात कोणती उत्पादने वापरली आहेत हे तपासायला विसरू नका. एका अतिशय प्रसिद्ध सौंदर्यप्रसाधन कंपनीच्या पावडरमध्ये (Powder) अत्यंत धोकादायक एस्बेस्टोस पदार्थ आढळून आला, ज्यामुळे कर्करोग होतो. या प्रकरणात या कंपनीला कोट्यवधी रुपयांचे नुकसान भरावे लागले. त्यामुळे तुम्हालाही पावडर (Powder) वापरायची असेल तर फक्त हर्बल प्रोडक्ट (Herbal Product) पावडर वापरा.
पावडर धोकादायक का आहे?
पावडरच्या (Powder) घटकामध्ये एस्बेस्टोस नसल्याची खात्री करा. त्याचे फुफ्फुसात शिरल्याने कर्करोग होऊ शकतो. तसेच, पावडरमध्ये कृत्रिम सुगंध जोडला जातो, ज्यामुळे त्वचा आणि फुफ्फुसांमध्ये समस्या उद्भवू शकतात. अनेक संशोधनातून हे समोर आले आहे की टॅल्कम पावडरमुळे फुफ्फुस आणि श्वासोच्छवासाचा त्रास होऊ शकतो.
हर्बल उत्पादने खरेदी करा
बाजारात तुम्हाला अनेक चांगल्या ब्रँड्सचे हर्बल पावडर (Herbal Powder) स्वस्तात मिळतील ज्यात सर्व नैसर्गिक उत्पादने वापरली जातात. तुम्ही त्यांचे घटक तपासू शकता आणि फुफ्फुसांना त्रासदायक नसलेली पावडर खरेदी करू शकता.
पावडर कशी लावायची
जर तुम्हाला स्वतःसाठी किंवा मुलांसाठी पावडर लावायची असेल तर लक्षात ठेवा की प्रायव्हेट पार्टवर पावडर लावू नका. तसेच, पावडर शिंपडण्याऐवजी, प्रथम हातावर घ्या आणि नंतर मानेवर किंवा चेहऱ्यावर लावा. यामुळे पावडरचे सूक्ष्म कण नाकातून किंवा तोंडातून शरीरात जाणार नाहीत.