पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी लस घेतली नसेल तर त्यांचे वेतन स्थगित होऊ शकतं. तसं परिपत्रक पालिका आयुक्त राजेश पाटील यांनी काढलंय. यासाठी 20 जुलैपर्यंत ची मुदत ही देण्यात आली आहे.
सर्वसामान्यांनी लस घ्यावी अशी जनजागृती प्रशासन करत असताना, पालिकेचा कर्मचारी लस अभावी मागे राहू नये. म्हणून वेतन स्थगित करण्याचा इशारा आयुक्तांनी दिला. पालिकेत एकूण 7 हजार 479 कर्मचारी आहेत. यात अधिकारी, कर्मचारी, सेवानिवृत्त झालेले पेन्शनधारक कर्मचारी, मानधनावरील तसेच ठेकेदारपद्धतीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. यापैकी बहुतांश कर्मचाऱ्यांनी दोन्ही डोस घेतलेत, मात्र काही कर्मचाऱ्यांनी अद्याप हो लस घेतलेली नाही. अशा कर्मचाऱ्यांनी 20 जुलैपर्यंत लस न घेतल्यास त्यांचं वेतन स्थगित होऊ शकतं. असं परिपत्रकाद्वारे आयुक्तांनी सूचित केलं आहे.