Mumbai

दक्षिण मुंबई वीज पुरवठा खंडित प्रकरणी उच्चस्तरीच चौकशी करणार-ऊर्जामंत्री

Published by : left

दक्षिण मुंबई वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर स्वतः ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी 'ऍक्शन मोड'मध्ये येत सर्व संबंधित अधिकारी आणि टाटा कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात होते.

अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसही अंधारात गेले होते. वीज पुरवठा खंडित होण्याचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दरम्यान, तासाभराच्या प्रयत्नानंतर वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला. तसेच ओव्हरहेड वायरवरील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी सांगितले की, "या घटनेची माहिती मिळताच मी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे तसेच महापारेषण व राज्य भार प्रेषण केंद्रातील प्रमुखांशी सतत संपर्कात होतो. वीज पूरवठा तात्काळ पूर्ववत व्हावा यासाठी मी त्यांना सूचना दिल्या आणि या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच टाटा कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ही प्रत्यक्ष बोलून वीज पुरवठा तात्काळ सुरू होण्याबाबत चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या. विविध कारणांमुळे झालेला हा बिघाड दुरुस्त करून अवघ्या ७० मिनिटात दक्षिण मुंबईतील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला,"असे डॉ. राऊत यांनी म्हटले आहे. "या प्रकरणाची गंभीर दखल मी घेतली असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर उचित कारवाई केली जाईल,"असेही डॉ. राऊत यांनी जाहीर केले.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी