मुंबई : भाजपने महाविकास आघाडीच्या तीन मतांवर आक्षेप घेतला आहे. काँग्रेसच्या यशोमती ठाकूर, राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड आणि शिवसेनेचे सुहास कांदे या तिघांनी नियमांचं उल्लंघन केल्याचं भाजपने म्हटलं असून, रिटर्निंग ऑफिसरला त्यांची मतं अवैध ठरवावी अशी मागणी केली आहे. भाजपचे पोलिंग एजंट पराग अलवानी आणि पीयूष गोयल यांनी म्हटलं आहे. दरम्यान, दुपारी ३ वाजेपर्यंत २८५ आमदारांनी मतदान केलं होतं. तर पुढच्या काही तासांतच या निवडणुकांचे निकाल समोर येतील. विशेषत: शिवसेनेचे संजय पवार आणि भाजपचे धनंजय महाडिक यांचे देव तोवर पाण्यात असणार आहे.
मतपत्रिका पक्षाच्या पोलिंग एजंटच्या हातात दिल्यानं भाजपनं आक्षेप घेतला आहे. आमदार मतपत्रिका फक्त पक्षाच्या एजंटला दाखवू शकतात, कुणालाही देऊ शकत नाहीत. मात्र या मतदारांनी एजंटच्या हातात मतपत्रिका दिल्यानं नियमांचं उल्लंघन झालं असल्याचं भाजपने म्हटलं आहे.