अमरावती प्रतिनिधी|सुरज दाहाट : राज ठाकरेंना (Raj Thackeray) महाराष्ट्रात असंतोष निर्माण करायचा आहे असा आरोप मंत्री यशोमती ठाकूर यांनी केला आहे. हिंदू धर्म कोणाची मक्तेदारी नाही असंही त्या म्हणाल्या आहेत. अमरावतीत (Amravati) पालकमंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांच्या कडून हनुमानाची महाआरती आज करण्यात आली.
काही लोकं असं दाखवत आहेत की, हिंदू धर्मावर त्यांचीच मक्तेदारी आहे. मात्र हिंदु धर्म कोणाचीही मक्तेदारी नाही असा जोरदार टोला अमरावतीच्या पालकमंत्री व काँग्रेस नेत्या यशोमती ठाकुर यांनी भाजपला आणि मनसेला लगावलाआहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना महाराष्ट्रात असंतोष निर्माण करायचा आहे. तो आम्ही होऊ देणार नाही असा इशारा राज ठाकरेंना मंत्री यशोमती ठाकुर यांनी दिला आहे. राज्यात सध्या हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी सर्व राजकीय पक्षांमध्ये चढाओढ सुरू झालेली आहे.
दरम्यान, उद्या हनुमान जयंती दिनी अमरावतीत हनुमान मंदिरात राणा दाम्पत्याकडून हनुमान चालीसाचे पठण होणार आहे. तसेच त्यांनी जाहीर केलं की, सर्व मंदिरात हनुमान मंदिरांमध्ये हनुमान चालीसाचं पठण व्हावं यासाठी मोफत भोंग्याचं वाटप देखील करणार आहे अशी माहिती आमदार रवी राणा यांनी दिली. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा हनुमान जयंती दिनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण केलं पाहिजे अशी प्रतिक्रिया रवी राणा यांनी दिली.