दरवर्षी शिवाजी पार्कवर होणारा दसरा मेळावा ही शिवसेनेची परंपरा आहे. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या दसरा मेळाव्यात एकमेकांवर जोरदार आरोप - प्रत्यारोप ही केले गेले. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शिवसेनेचा वार्षिक दसरा मेळावा हा शिवाजी पार्क मैदानात पार पडला तर शिंदे गटाचा दसरा मेळावा हा वांद्रे- कुर्ला संकुलात झाला.
सगळीकडून दसरा मेळाव्यासाठी माणसं येत होती. कोणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की उद्धव ठाकरे याकडे साऱ्यांचे लक्ष लागले होते. यावर पोलिसांना सांगितले आहे की, शिंदे गटाच्या मेळाव्यात सुमारे एक लाख 25 हजारांच्या आसपास लोक होती तर ठाकरे गटाच्या मेळाव्यात सुमारे 65 हजारांहून अधिक लोक उपस्थित होते. शिंदे गटाचा मेळावा वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्समधील मैदानावर पार पडला. या मेळाव्यासाठी जवळपास 1 लाख 25 हजार लोक उपस्थित असल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
पोलिसांनी ही आकडेवारी अंदाजे सांगितली आहे. यात कमी - जास्त आकडेवारी असू शकते. असे सांगितले जात आहे. बरेच लोक मैदानात होते आणि काही लोक मैदानाबाहेरही उभे होते. त्यामुळे जवळपास 65 हजार लोकांनी शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यासाठी हजेरी लावल्याचं पोलिसांकडून अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.