Devendra fadanvis, Eknath shinde Team Lokshahi
ताज्या बातम्या

एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असताना देवेंद्र तातडीने दिल्लीला रवाना

एकनाथ शिंदे 35 आमदारांसोबत गुजरातमध्ये असल्याचेही म्हटले जात आहे.

Published by : shweta walge

विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीनंतर शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे नॉट रिचेबल असून त्यांच्यासोबत शिवसेनेचे १३ आमदार असल्याचे बोलले जात आहे. सध्या एकनाथ शिंदे 35 आमदारांसोबत गुजरातमध्ये असल्याचेही म्हटले जात आहे. या सर्व चर्चांच्या पार्श्वभूमीवर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत.

एकनाथ शिंदे सूरतमध्ये असल्याचं बोललं जात आहे. विधान परिषदेत शिवसेनेचे दोन्ही उमेदवार काठावर पास झाले आहेत. शिवसेनेचे तब्बल 3 आमदार आणि समर्थक अपक्ष आमदारांची 9 अशी एकूण 12 मतं फुटल्याचं कालच्या विधान परिषद निवडणुकी स्पष्ट झालं आहे. त्यानंतर आता देवेंद्र फडणवीस दिल्लीला पोहोचले आहेत. ते दिल्लीला का गेले आहेत. त्याची कारणं काय आहेत? याबाबत नक्की माहिती मिळू शकलेली नाही.

देवेंद्र फडणवीस नाशिकमधील योगदिनानिमित्त एका कार्यक्रात भाग घेणार होते. तसेच ते एका कॉलेजच्या उद्घाटन कार्यक्रमातही सहभागी होणार होते. मात्र रात्री मतमोजणीला उशीर झाल्यामुळे फडणीस यांनी हा दौरा रद्द केला. त्यानंतर आता फडणवीस दिल्लीला पोहोचले आहेत

एकनाथ शिंदे हे काल सायंकाळी विधान परिषदेचा निकाल लागण्याच्या आधीपासूनच शिवसेना नेत्यांच्या संपर्कात नसल्याचं सांगितलं जातंय. एकनाथ शिंदेंसोबत 35 आमदारही शिवसेनेच्या संपर्कात नसल्याची माहिती समोर येत आहेत. याच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर दुपारी १२ वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सर्व शिवसेना आमदारांची ‘मातोश्री’वर बैठक बोलावली आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : काँग्रेसला मोठा धक्का; संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांचा पराभव

Sanjay Upadhyay Wins: बोरिवलीमधून संजय उपाध्याय विजयी

Bachhu Kadu: अचलपूरमधून बच्चू कडू यांचा पराभव

शरद पवार गटाला अजित पवारांचा दे धक्का; सचिन पाटील विजयी

Suhas Babar Khanapur Vidhan Sabha Election Result 2024: शिवसेना शिंदे गटाचे सुहास बाबर विजयी