ताज्या बातम्या

इसिसच्या हायटेक मॉडेलमध्ये आयटी, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट व्यावसायिक

राष्ट्रीय तपास संस्थेने कोल्हापूर व नांदेडमध्ये धाडी टाकल्या... मध्यप्रदेशातील भोपाळ, रायसेन, बिहारचे अररिया, गुजरातचे भरूच, सूरत, नवसारी, अहमदाबाद, युपीचे देवबंद, कर्नाटकचे भटकळ, तुमकुर येथेही छापे टाकले

Published by : Team Lokshahi

राष्ट्रीय तपास संस्थेने कोल्हापूर व नांदेडमध्ये धाडी टाकल्या... मध्यप्रदेशातील भोपाळ, रायसेन, बिहारचे अररिया, गुजरातचे भरूच, सूरत, नवसारी, अहमदाबाद, युपीचे देवबंद, कर्नाटकचे भटकळ, तुमकुर येथेही छापे टाकले... त्यात देशात इस्लामिक स्टेटच्या हायटेक मॉड्यूलचा खुलासा झाला...

इस्लामिक स्टेट्स किंवा इस्लामिक स्टेट्स ऑफ इराक ॲन्ड सीरिया म्हणजेच आयएसआयएस ही एक आंतरराष्ट्रीय अतिरेकी संघटना आहे. आयएसची स्थापना 2004 साली झाली. आयएसचे अतिरेकी जगभर कार्यरत असून भारत, अमेरिका, रशिया, युरोपियन संघ इत्यादी प्रमुख देशांनी तिला अतिरेकी संघटना म्हणून घोषित केले आहे.

किती धोकादायक आहे संघटना

  • अमेरिकी गुप्तचर संस्थेच्या दाव्यानुसार, इसिसकडे 30 हजारपेक्षा अधिक दहशतवादी सैनिक.

  • युनोच्या मते जगभरातल्या 80 देशांत 15 हजार दहशतवादी आयएसमध्ये सक्रिय.

  • दोन अब्ज डॉलरची संपत्ती असलेली आयएस ही जगातली सर्वात श्रीमंत दहशतवादी संघटना.

  • बँका, तेल आणि नैसर्गिक वायूचे स्रोत, कर, अपहरण, खंडणी आदी मार्गाने निधी जमवते.

  • आधुनिक तंत्रज्ञान व सोशल मीडियाच्या जोरावर इसिसमध्ये सैनिकांची भरती होते.

  • 30,000 हजारापेक्षा अधिक दहशतवादी सैनिक.

  • युनोनुसार, 80 देशांत 15 हजार दहशतवादी.

  • तब्बल दोन अब्ब डॉलरची संपत्ती

  • बँका, तेल, अपहरण, खंडणीच्या मार्गाने संपत्ती

  • तंत्रज्ञान, सोशल मीडियाच्या जोरावर भरती.

एनआयएने 6 राज्यांच्या 13 ठिकाणांहून 48 लोकांना ताब्यात घेतले आहे. त्यांची चौकशी केल्यावर त्यांना नूपुर शर्मा प्रकरणानंतर काहीतरी मोठे करण्याचे निर्देश मिळाले होते. यासाठी देशातील धार्मिक स्थळे, लष्करी ठिकाणे, राज्यांची पोलिस मुख्यालये निशाण्यावर होती. एनआयएने ताब्यात घेतलेले बहुतांश आरोपी आयटी, अभियांत्रिकी आणि मॅनेजमेंट व्यावसायिक आहेत. त्यांनी एनआयएच्या कारवाईनंतर मोबाइल व लॅपटॉपमधून डेटा डिलीट केला. एनआयएने हे मोबाइल, लॅपटॉपमध्ये फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी