weather havoc team lokshahi
ताज्या बातम्या

हिमाचलमध्ये हवामानाचा कहर, 141 जणांचा मृत्यू, 13 जण बेपत्ता

अनेक लोक बेपत्ता; 538 कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान

Published by : Shubham Tate

weather havoc : हिमाचल प्रदेशात यावर्षी हवामानाने कहर केला आहे. पावसाळा सुरू झाल्याने अनेक लोकांचा मृत्यू झाला आहे, शेकडो लोक जखमी झाले आहेत आणि अनेक लोक बेपत्ता आहेत. यासोबतच अतिवृष्टी, भूस्खलन आणि पुरामुळे कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सरकारी आकडेवारीनुसार, राज्यात 29 जूनपासून खराब हवामानामुळे 141 लोकांचा मृत्यू झाला आहे, तर 564 लोक जखमी झाले आहेत. तसेच 13 जण बेपत्ता आहेत. राज्य आपत्ती प्राधिकरण आणि महसूल विभागाच्या अहवालानुसार, या मृत्यूंव्यतिरिक्त राज्याचे 538 कोटींहून अधिक मालमत्तेचे नुकसान झाले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाला 323 कोटी आणि जलशक्ती विभागाला 201 कोटींहून अधिक रकमेचे मूल्यांकन करण्यात आले आहे. एकूण नुकसानीचे मूल्यांकन अद्याप सुरू आहे. (weather havoc in himachal 141 killed in 1 month 13 people missing)

शिमल्यात सर्वाधिक मृत्यू

शिमला जिल्ह्यात सर्वाधिक 22, कुल्लूमध्ये 21, चंबामध्ये 17, कांगडामध्ये 12, मंडीमध्ये 17, सिरमौरमध्ये 12 आणि मंडी जिल्ह्यात 17 जणांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय बिलासपूरमध्ये 6, हमीरपूरमध्ये 8, किन्नौरमध्ये 3, लाहौल-स्पीतीमध्ये 6, सोलनमध्ये 9 आणि उना जिल्ह्यात 8 जणांचा मृत्यू झाला आहे. यातील बहुतांश मृत्यू खराब हवामानामुळे झालेल्या अपघातात झाले आहेत. कुल्लूमध्ये 5, चंबामध्ये एक आणि उना जिल्ह्यात 7 जण बेपत्ता आहेत. याशिवाय 104 गुरांचा मृत्यू झाला आहे. 25 पक्की आणि 50 कच्ची घरेही पावसाळ्यामुळे वाहून गेली आहेत. 163 कच्चा आणि 50 पक्क्या घरांचे अंशत: नुकसान झाले.

अचानक आलेला पूर आणि ढगफुटीमुळे झालेले नुकसान

अचानक आलेल्या पूर आणि ढगफुटीमुळे राज्यातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काही भागात अजूनही पूरसदृश स्थिती आहे. राज्यात ५ ऑगस्टपर्यंत हवामान खराब राहण्याचा अंदाज आहे. राज्यात सर्वच भागात पाऊस तर काही भागात मुसळधार पावसाची शक्यता आहे. सिमला हवामान केंद्राचे संचालक सुरेंद्र पॉल यांनी सांगितले की, 5 ऑगस्टपर्यंत राज्यात यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पर्यटक आणि स्थानिक लोकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नदी नाल्यांपासून दूर राहा आणि विनाकारण प्रवास करू नका, असा सल्ला देण्यात आला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : आजचा निकाल पूर्णपणे अनपेक्षित- उद्धव ठाकरे

महायुतीत भाजपच मोठा भाऊ, सत्तेच्या चाव्या कुणाच्या हाती?

Kokan Vidhansabha: रत्नागिरीत सामंत तर सिंधुदुर्गात राणे बंधूंची हवा

Sanjay Rathore Win Digras Vidhan Sabha Election Result 2024; दिग्रस मतदारसंघात संजय राठोड पाचव्यांदा विजयी

Uddhav Thackeray: विधानसभेचा निकाल अनाकलनीय आणि अनपेक्षित: उद्धव ठाकरे