vijay wadettiwar Team Lokshahi
ताज्या बातम्या

'झालं ते पुरं झालं', आता नव्याने दारू परवाना नकोच : वडेट्टीवार

चंद्रपूर जिल्ह्यातील दारुविक्रीवर vijay wadettiwar यांची प्रतिक्रिया

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अनिल ठाकरे | चंद्रपूर : जिल्ह्यातील दारूबंदी (Liqour Ban) उठवून मद्यविक्री सुरु करण्यात आली. मात्र, मद्यविक्री सुरु झाल्यानंतर चंद्रपूर (Chandrapur) जिल्ह्यात दारू दुकाने उघडण्याची अक्षरशः स्पर्धा लागली आहे. यावर 'झालं ते पुरं झालं' आता नव्याने दारू दुकानासाठी परवानगी नको, अशा शब्दात मंत्री विजय वडेट्टीवार (vijay wadettiwar) यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

चंद्रपूर जिल्ह्यात दारुबंदी उठल्यानंतर बिअर शॉपी, वाईन शॉपी, बिअर बार, देशी दारूची दुकाने उघडण्याची जणू स्पर्धा सुरु झाली आहे. यावर विजय वडेट्टीवार यांना विचारले असता झालं ते पुरं झालं. आता नव्याने दारू दुकानासाठी परवानगी नको, असे वक्तव्य त्यांनी केलं.

दारूबंदी उठल्यानंतर ज्या दारू दुकानांना परवानगी दिली गेली आहे, ती परवानगी नियमात बसणारी आहे काय? याबाबत चौकशी केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. बिअर शॉपीचा परवाना देतांना नियमांची पायमल्ली झाली असेल तर तर परवाना रद्द करण्याचा सूचनाही दिल्याची माहिती वडेट्टीवारांनी दिली.

दरम्यान, भाजपा सरकारच्या काळात सुधीर मुनगंटीवार पालकमंत्री असताना चंद्रपुरात दारूबंदी करण्यात आली होती. यानंतर महाविकास आघाडी सरकारने दारुबंदी उठवण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केलेआहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी