विजय शिवतारे यांची पुन्हा कार्यकर्त्यांसोबत बैठक पार पडली. या बैठकीनंतर विजय शिवतारे यांनी पत्रकार परिषद घेतली. विजय शिवतारे म्हणाले की, मी कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन निर्णय घेईन असं सांगितले होते. त्यावर तिखट प्रतिक्रिया देखील मला ऐकाव्या लागल्या. आणि मग मी त्यांना समजावून मी लढल्यानंतर काय झालं असतं, मी खासदार झालो असतो तर काय झालं असते. त्याच्याऐवजी येवढा सगळ्या पुढे जाऊन एकच फोन मला असा आला होता माझी उपमुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली होती. मुख्यमंत्र्यांशी 2 वेळा प्रत्यक्ष चर्चा झाली. तरीही मी माझा निर्णय बदलला नव्हता.
मी ठरवलेलं होते करायचे पण एक फोन. खतगावकर करुन जे ओएसडी आहेत मुख्यमंत्री महोदयांचे. मी ऐकतच नाही त्यावेळेस माझ्यावर मुख्यमंत्री रागावलेसुद्धा एकदा. पण तरीही मी निघून आलो. त्यानंतर खतगावकर यांचा फोन मला आला. बापू मुख्यमंत्र्यांना तुमच्यामुळे अडचण होत आहे. महायुतीला अडचण होतंय तुमच्यामुळे. सर्व ठिकाणी जर अपक्ष उमेदवार लोकांनी एकमेकांच्या विरुद्ध केलेत तर महाविकास आघाडीचा फायदा होईल. कदाचीत 10 - 20 खासदार पडतील अशी परिस्थिती आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या मुख्यमंत्र्यांना सांभाळायचे आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना कुठेतरी विजय शिवतारे ऐकत नाही त्यामुळे वरिष्ठ नेत्यांकडून जर काय गैरसमज झालं तर ते चालणार नाही. हे जेव्हा मला त्यांनी सांगितले. त्या क्षणार्धात की याच्यामुळे मुख्यमंत्र्यांची अडचण होते आणि महायुतीची अडचण होते.
एका आपल्या स्थानिक लढ्यासाठी राज्याचे हित आणि त्याचबरोबर तिसऱ्यांदा देशाची सत्ता भाजपाच्या हातात देण्यासाठी जर कुठं माझ्याहातून जर अशाप्रकारचा प्रमाद घडला. तर कदाचित तो इतिहासात लिहिला जाईल. म्हणून निव्वळ आणि निव्वळ मुख्यमंत्र्यांच्या ओएसडींच्या फोनवरुन मी म्हटलं मी लगेच येतो. आणि मुख्यमंत्री महोदय खूश झाले. ते म्हणाले चांगला निर्णय तुम्ही घेतला, सर्वांच्या हिताचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री अशी आमची 3 तास चर्चा झाली. मी सुरवातीला सर्व ऐकूण घेतलं. नंतर माझं ही म्हणणं मांडलं. मी निव्वळ आमदारकीसाठी इथं आलेलो नाही. माझं लोकांचं काम झालं पाहिजे. कमीतकमी पुरंदरमधून दीड लाख मतं ही महायुतीच्या उमेदवाराला झाली पाहिजेत. अशा सर्वांना सूचना देण्यात आल्या आहेत. कुठच्याही परिस्थितीमध्ये एक मत देखील इकडे तिकडे जाता कामा नये. हा उमेदवार प्रचंड बहुमतांनी निवडून कमीतकमी 50 हजार मतांच्या मताधिक्याने पुरंदरमधून आमचा उमेदवार निवडून आणणं. सगळं बाजूला ठेऊन हा उमेदवार निवडून आणू.
पंतप्रधान मोदी यांचे हात बळकट करण्याचं काम करावं असा ठराव आज आम्ही केला. सर्व लोकांनी एकमुखाने महायुतीच्या घोषणा दिल्या. दादांशीसुद्धा आमची चर्चा होईल. जेवढी कटूता होती ना तेवढी बाजूला सारुन राजकारणामध्ये कोणीच कोणाचा दुश्मन नसतो. त्यानुसार हे सगळं बाजूला ठेऊन आम्ही पूर्णपणे सुनेत्रा वहिनी उमेदवार ज्या असतील. अजून जाहीर नाही केलेलं पण आता जाहीर होईल. सुनेत्रा ताईंना आम्ही बहुमताने निवडून आणू. हा निर्णय आमचा सर्वांचा झाला आहे. मुख्यमंत्री महोदयांचे मी मनापासून आभार मानतो, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांचेही आभार मानतो. मोठे मन दाखवून अजितदादासुद्धा एकदा मिटवायचं आपल्याला सगळं म्हणून ते ही बसले. चांगली चर्चा झाली. त्यांचेही मी आभार मानतो. महाराष्ट्रामध्ये महायुतीचे 45 खासदार कमीतकमी आले पाहिजे. यादृष्टीने निव्वळ इथेचं नव्हे जिथे जिथे गरज पडेल. जिथे जिथे मुख्यमंत्री सांगतील, दोन्ही उपमुख्यमंत्री सांगतील त्याठिकाणी प्रचाराला देखील आपली सगळी मंडळी निश्चितपणे जातील. असं विजय शिवतारे म्हणाले.