अमेरिकेन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी दक्षिण कोरियाकडे रवाना झाल्या आहेत. चीनचा इशारा धुडकावून लावत अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी काल तैवानमध्ये दाखल झाल्या होत्या. आज त्यांनी तैवानच्या राष्ट्राध्यक्षांची भेटही घेतली आणि दक्षिण कोरियाकडे रवाना झाल्या आहेत. तर दुसरीकडे जग सध्या रशिया आणि यूक्रेनच्या युद्धामुळं होरपळत आहे. भारताच्या पूर्वेकडे असा संघर्ष सुरु झाल्यास त्याचे अत्यंत नकारात्मक परिणाम आशियाला भोगावे लागण्याची शक्यता आहे. (Nancy Pelosi Taiwan Visit)
पेलोसींच्या तैवान दौऱ्याचा चीनकडून निषेध करण्यात आला आहे. नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये पोहोचल्यानंतर चीनने अमेरिकेला इशारा दिला आहे. अमेरिकेनं परिणामांना तयार राहावं, अशा इशारा चीननं दिला आहे. चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीकडूम तैवानच्या सीमांवर युद्ध सराव सुरु केला. अमेरिकन संसदेच्या अध्यक्षा नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये असताना चीनकडून युद्धसराव करण्यात आला. दरम्यान नॅन्सींच्या दौऱ्याला विरोध करत चीननं अमेरिकेला गंभीर इशारा दिला होता. नॅन्सी यांच्या आगमनावेळी चीननं बॉम्ब हल्ल्याची धमकी दिल्यानं तैपेईच्या विमानतळावर संपूर्ण अंधार करण्यात आला होता. दुसरीकडे पेलोसी यांच्या सुरक्षेसाठी प्रवासादरमयान अमेरिकेच्या तेरा लढाऊ विमानांचं सुरक्षा कवच करत नॅन्सी पेलोसी तैवानमध्ये दाखल झाल्या.