शिवसेना, शिंदे गट आणि एकूणच महाराष्ट्रासाठी आज महत्त्वाची बातमी आहे. धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार यावर आज फैसला होण्याची शक्यता आहे. धनुष्यबाण चिन्ह नेमकं कुणाला द्यायचं याबाबत निवडणूक आयोग आज निर्णय देण्याची शक्यता आहे. शिवसेना नेमकी कोणाची, यावर निर्णय घेण्यासाठी ठाकरे आणि शिंदे गटाला दिलेली मुदत आज संपत आहे. केंद्रीय निवडणूक आयोग धनुष्यबाणाचा हक्क कोणत्या गटाकडे सुपूर्द करणार, याकडे साऱ्या राज्याचं लक्ष लागलंय.
अंधेरी-पूर्व विधानसभा मतदारसंघामध्ये ३ नोव्हेंबरला पोटनिवडणूक होत आहे. 14 ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. त्यापूर्वी केंद्रीय निवडणूक आयोगाकडून निकालाची अपेक्षा आहे. निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना 7 ऑक्टोबपर्यंत कागदपत्रे सादर करण्यास सांगितली होती. त्यामुळे आज ठाकरे गटाच्या वतीने कोणती कागदपत्रे आयोगाला दिली जातात आणि आयोगासमोर कोणता युक्तिवाद केला जातो.
शिवसेनेमध्ये जूनमध्ये झालेल्या बंडखोरीनंतर शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दावा घेत निवडणूक चिन्हावर दावा केला होता आणि तातडीने सुनावणी घेऊन धनुष्य-बाणाच्या हक्कावर निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयामधील प्रलंबित खटल्यांचा निकाल लागेपर्यंत निवडणूक आयोगासमोर सुनावणी न घेण्याची विनंती ठाकरे गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात केली होती.