काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार नाराज असल्याच्या चर्चाणा उधाण आलं होतं. यावरच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी अजित पवारांची नाराजी दूर झाली की नाही माहीत नाही? त्यांची नाराजी मी बघितली नसल्याचे वक्तव्य केलं आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, अजित पवार चांगले काम करत होते. ते आमच्यासोबत आहेत म्हणून, ज्यांची पोटदुखी होती आता त्यांच्या उरावर अजितदादा बसले आहेत असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर टीका केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेसुद्धा नांदेड, नागपूरला गेले नाहीत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर जातच नाहीत. खुलेआम भ्रष्टाचार सुरु आहे. औषध खरेदी कुठल्याही निविदा प्रक्रिया विना सुरु आहे. जर असा व्यवहार होत असेल तर चौकशी कशी करणार असेही उद्धव ठाकरे म्हणाले. रुग्णालयात जर एवढे मृत्यू होत असतील तर आरोग्य मंत्र्यांनी राजीनामा द्यावा असेही उद्धव ठाकरे म्हणाले.
दरम्यान, मी दसरा मेळाव्यात विस्ताराने बोलेन. मी अस्वस्थ आहे, आरोग्य यंत्रणेचे तीन तेरा वाजले आहेत. हे बघून संताप येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. कोरोनाचे संकट होतं तेव्हा महाविकास आघाडीचा सरकार होतं. आताही आरोग्य यंत्रणा तिच आहे. या आरोग्य यंत्रणेने कोरोनाचा सामना केला असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.