लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यातच आता उदय सामंत म्हणाले की, या देशामध्ये पांढऱ्या दाढीला सध्या महत्त्व आहे. ४ जूननंतर पांढरी दाढी पुन्हा तिकडे बसणार आहे. त्यामुळे भूलथापांना बळी पडू नका.
काहीजण तुतारी वाजवतील काही लोकं मशाली घेऊन धावतील काही परिणाम होणार नाही. आज प्रत्येकाने माझ्या नावाची एक चिठ्ठी खिशामध्ये ठेवली तरी चालेल आणि 4 तारखेला मला संध्याकाळी विचारा कोण पंतप्रधान झालं. त्यामुळे आपण हा विचार केला पाहिजे कोण आपलं प्रश्न सोडवणार आहे. असे उदय सामंत म्हणाले.