Elon Musk Twitter Team Lokshahi
ताज्या बातम्या

Twitter deal : ट्विटर विकत घेण्याचा इलॉन मस्कचा करार स्थगित, जाणून घ्या कारण...

इलॉन मस्क यांनी ट्विट करत काही काळासाठी हा करार होल्डवर ठेवल्याची दिली माहिती

Published by : Team Lokshahi

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क (Elon Musk) यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटर विकत घेण्याचा करार (Twitter deal)केला होता. 44 मिलियन डॉलर (44 Million Dollar) इतकी किंमत मोजत ऍलन मस्कनं हा व्यवहार केला. हा करार निश्चित होण्यापूर्वी इलॉन मस्क यांनी ट्विट करत काही काळासाठी हा करार होल्डवर (emporarily on hold)ठेवण्यात आल्याचे टि्वट केले. t

मस्क म्हणतात की, ट्विटरवर स्पॅम किंवा बनावट खाती खरोखर 5% पेक्षा कमी आहेत की नाही याचा अचूक गणना तपशील अद्याप उघड झालेला नाही. त्यामुळे हा करार रखडला आहे. ट्विटरचा अंदाज आहे की 2022 च्या पहिल्या तिमाहीत बनावट किंवा स्पॅम खाती त्याच्या दैनिक सक्रिय वापरकर्त्यांपैकी 5% पेक्षा कमी आहेत.

बॉट्स कराराच्या मार्गात अडथळा बनतात

मस्कने गेल्या आठवड्यातच या करारासाठी $7 अब्ज सुरक्षित केले आहेत, जेणेकरून तो $44 अब्जचा हा करार पूर्ण करू शकेल. डील झाल्यापासून इलॉन प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेली बनावट आणि बॉट खाती काढून टाकण्याबद्दल बोलत आहे. तो कराराच्या वेळी म्हणाला होता की जर हा करार झाला तर त्याचे प्राधान्य प्लॅटफॉर्मवरून बॉट खाती काढून टाकण्यास असेल.

ट्विटरवरही अनेक धोके आहेत

या महिन्याच्या सुरुवातीला, कंपनीने आपल्या फाइलिंगमध्ये सांगितले होते की जोपर्यंत हा करार बंद होत नाही तोपर्यंत त्यांना विविध जोखमींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः जाहिरातीशी संबंधित. जाहिरातदार ट्विटरवर खर्च करत राहतील आणि 'भविष्यातील योजना आणि रणनीती याबाबत अनिश्चितता आहेत'

टि्वटरच्या संचालक मंडळाने अखेर टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांचा प्रस्ताव मान्य केला. त्यानंतर 54.20 डॉलर प्रति समभाग किमतीत विक्री प्रस्तावाला मंजुरी दिली. ही किंमत कंपनीच्या समभागाच्या 1 एप्रिल रोजीच्या बंद भावापेक्षा 38 टक्के जास्त होती. मस्क कंपनीच्या मालकी हक्कासाठी टि्वटरला 4400 कोटी डॉलर(सुमारे 3.37 लाख कोटी रु.) रोकड देतील. हा व्यवहार एका वर्षात पूर्ण होऊ शकतो. कंपनी आता यावर शेअरधारक आणि नियामकांच्या मंजुरीची प्रक्रिया सुरू करेल.

या व्यवहारानंतर जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मस्क बहुचर्चित मायक्रो ब्लॉगिंग प्लॅटफॉर्मचे मालक होतील. या वृत्तानंतर नॅसडॅकमध्ये सोमवारी टि्वटरचे समभाग 6.87% उसळून 52.29९ डॉलरवर गेले. मस्क यांनी खरेदीचा प्रस्ताव अलीकडे दिला होता.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी