Elon Musk Twitter Team Lokshahi
ताज्या बातम्या

नोकरकपातीनंतर ट्विटरची डझनभर कर्मचाऱ्यांना परत येण्याची विनंती

एलॉन मस्क यांनी या कंपनीतील जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी नवीन नियम जारी केले आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

एलॉन मस्क यांनी या कंपनीतील जवळपास ५० टक्के कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढून टाकले आहे. ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी नवीन नियम जारी केले आहेत. ट्विटरवरील 'पॅरोडी अकाऊंट'बाबत त्यांनी हा नियम जारी केला आहे. त्यांनी ट्विट केले की, जर एखाद्या लोकप्रिय व्यक्तीच्या नावाने कोणतेही हँडल बनवले गेले असेल आणि 'विडंबन' म्हणून स्पष्टपणे चित्रित केले नसेल तर ते खाते कायमचे निलंबित केले जाईल.

“ट्विटरमधील कर्मचारी कपातीविषयी बोलायचं झालं, तर दुर्दैवाने आमच्यासमोर काही पर्यायच उरला नव्हता. कंपनीचं दिवसाला तब्बल ४ दशलक्ष डॉलर्सचं नुकसान होत होतं”, असं स्पष्टीकरण एलॉन मस्क यांनी या नोकरकपातीनंतर दिलं आहे. “ज्यांना कामावरून काढण्यात आलं आहे, त्यांना तीन महिन्यांचा परतावा देण्यात आला आहे. नियमात असल्यापेक्षा हा आकडा किमान ५० टक्क्यांनी अधिक आहे” असे एलोन मस्क यांनी सांगितले.

ट्विटरने अलीकडेच ५०% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. यासोबतच ट्विटरने iOS वर वापरणाऱ्यांसाठी शुल्कही लावले आहे. ट्विटरने यासाठी 8 डॉलरची रक्कम निश्चित केली आहे. या नोकरकपातीनंतर एक नवी माहिती समोर येत आहे. ट्विटरने गेल्या आठवड्यात जवळपास साडेतीन हजार कर्मचाऱ्यांना कामावरुन काढून टाकले आहे. या कपातीमध्ये भारतातील २३० पैकी १८० कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. अत्यंत महत्त्वाच्या तांत्रिक बाबी हाताळणाऱ्या विभागांमध्ये नोकरकपात करण्यात आलेली नाही. या कर्मचाऱ्यांना सध्या नोकरीवर कायम ठेवण्यात आलं असून त्यांच्या भविष्यातील भूमिकांविषयी लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे ट्विटरने सांगितले आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी