थोडक्यात
राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली
निवडणूक आयोगाने घेतला निर्णय
विजय वडेट्टीवार यांची ट्विट करत प्रतिक्रिया
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या आधी राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली असून बदली करण्याचे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने दिले आहेत. काँग्रेस आणि इतर पक्षांनी त्यांच्या बदलीची निवडणूक आयोगाकडे मागणी करण्यात आली होती.
याच पार्श्वभूमीवर आता राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया येत आहेत. विजय वडेट्टीवार यांनी ट्विट करत म्हटले आहे की, राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करण्याचा निर्णय आज निवडणूक आयोगाने घेतला आहे. आम्ही या निर्णयाचे स्वागत करतो. महायुतीचे सरकार बेईमानी करत होते हे आज स्पष्ट झाले. गंभीर स्वरूपाचे आरोप असलेल्या पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुदतवाढ देण्याची अशी कोणती मजबुरी महायुती सरकारची होती?
यासोबतच ते पुढे म्हणाले की, महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक पारदर्शक पद्धतीने होऊ नये म्हणून त्यांना सरकारने त्यांना मुदतवाढ दिली होती. असंवैधानिक मार्गाने आलेल्या सरकारने असंवैधानिक मार्गाने अधिकाऱ्यांना पदांवर बसवले होते हे आज स्पष्ट झाले आहे. मर्जीतील अधिकाऱ्यांना मुदतवाढ देऊन सत्तेचा दुरुपयोग महायुती सरकारने केला होता! असे विजय वडेट्टीवार म्हणाले.