अभिषेक घोसाळकर यांच्यावर झालेल्या गोळीबार हत्येप्रकरणी त्यांची पत्नी तेजस्वी घोसाळकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ८ फेब्रुवारी २०२४ रोजी सायंकाळी माझे पती अभिषेक घोसाळकर यांच्या हत्येचा तपास योग्य दिशेने होत नाही आणि याबाबत माझी या तपासाबाबत मागणी आणि आम्ही जमा केलेली माहिती माननीय तपास यंत्रणेला आणि माननीय पोलीस आयुक्तांना दि. २८ फेब्रुवारीला सीसीटीव्ही फुटेज देऊन हत्येच्या वेळेला सदर ठिकाणी अरमेंद्र मिश्रा आणि मेहूल पारेख आणि अज्ञात व्यक्तींचा होत असलेला वावर याबाबत सदर व्यक्तींचा सखोल तपास करावा अशी मागणी केली होती.
ही बाब सर्व प्रसार माध्यमाने मांडली होती. याबाबत पोलीसांनी सखोल तपास केल्याचे दिसत नाही. दि ४ मार्च २०२४ रोजी माननीय पोलीस आयुक्त आणि तपास यंत्रणेला 120B SECTION 34 OF IPC कलम लावण्याचे विनंती केली होती. ती आतापर्यंत मान्य करण्यात आलेली नाही. किंवा तपास यंत्रणेने माझ्याशी संपर्क केला नाही. ५ मार्चला माननीय सत्र न्यायालयाने जे निरीक्षण नोंदवले आहे ते अतिशय महत्त्वाचे आहेत.
1. मॉरीसला गन दिल्याचे प्रथम दर्शन दिसून येते.
2. मॉरीस नरोन्हा आणि अमरेंद्र मिश्रा यांनी एकत्र जाऊन बुलेट खरेदी केल्या होत्या.
3. अभिषेक आणि मॉरीस नरोन्हा यांच्यात भेट होते हे अमरेंद्र मिश्रा यांना माहित होते.
4. अमरेंद्र मिश्रा यांचे लायसन्स मॉरीस नरोन्हा यांच्याकडे होते.
5. ज्या लोकरमध्ये गन होती ते तोडण्यात आले याचा अर्थ मॉरीस नरोन्हाला ऍक्सेस होता.
ज्या कार्यक्रमाला मॉरीसने अभिषेकला बोलावले होते त्याच कार्यक्रमाला मलाही बोलवलं आहे. मला जरा उशीर झाला त्यामुळे मला अभिषेक बोलला दुसऱ्या कार्यक्रमाला तू जा इथे येऊ नको. आणि हे हत्येचा प्रकरण जेव्हा झालं माझी फक्त एवढीच विनंती आहे की माझ्या दोन मुलांचं भवितव्य उधवस्त झाले आहेत. माझ कुटुंब उधवस्त झालेलं आहे. तर हायकोर्ट आणि पोलीस आयुक्त सगळ्यांना माझी विनंती आहे की या प्रकरणाचा लवकरात लवकर निर्णय लावावा आणि चौकशी करावी असे तेजस्वी घोसाळकर यांची मागणी आहे.