ताज्या बातम्या

Twitter Update: ट्विटरवर येणार 'हे' नवीन फीचर!

उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्वीटरचे सूत्र हाती घेतल्यापासून अनेक बदल केले आहेत. सुरुवातीलाच त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरून त्याचे नाव बदलून एक्स केले आहे. त्यानंतर ते यात सतत बदल करत यूजरल नवे फीचर देण्याचा प्रयत्न करत आहे.

Published by : Team Lokshahi

उद्योगपती एलॉन मस्क यांनी ट्वीटरचे सूत्र हाती घेतल्यापासून अनेक बदल केले आहेत. सुरुवातीलाच त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवरून त्याचे नाव बदलून एक्स केले आहे. त्यानंतर ते यात सतत बदल करत यूजरल नवे फीचर देण्याचा प्रयत्न करत आहे. यातच आता इंस्टाग्राम आणि फेसबुक टक्कर देत मस्क यांनी नव फीचर उपलब्ध करून दिले आहे. सोशल मिडिया प्लॅटफॉर्म X वर (पूर्वीचे ट्विटर) वर नवा अप़़डेट आला आहे. हे फिचर ऑक्टोंबरमध्ये कंपनीने आयफोन युजर्ससाठी जारी केले होते. मात्र आता ते अ‍ॅन्ड्रॉइड युजर्ससाठी जारी करण्यात आले आहे. X ने युजर्ससाठी ऑडियो-व्हिडियो कॉलिंग फीचर्स जारी केले आहे. याद्वारे युजर आता व्हॉट्सअ‍ॅप आणि इंस्टाग्रामवर करता येणारे व्हिडीओ कॉल, ऑडियो कॉल X प्लॅटफॉर्मवर देखील करू शकणार आहेत.

या फीचरची बऱ्याच दिवसांपासून प्रतीक्षा होती. अखेर या युजर्संची ही प्रतिक्षा संपली आहे. ऑडिओ आणि व्हिडिओ कॉलिंग फीचरची X वर अनेक महिन्यांपासून चाचणी केली जात होती आणि आता ते Android वापरकर्त्यांसाठी उपलब्ध केले जात आहे. सध्या ट्विटरवर ऑडिओ व्हिडिओ कॉलचा पर्याय फक्त प्राइम सदस्यांसाठी आहे. मात्र प्रत्येकाला कॉल रिसिव्ह करण्याची सुविधा असेल.

ऑडिओ-व्हिडिओ कॉल

1. जर तुम्ही प्रीमियम युजर्स असाल तर प्रथम अ‍ॅप सेटिंग्जवर जा.

2. आता Privacy and Safety या पर्यायावर टॅप करा.

3. येथे डायरेक्ट मेसेजचा पर्याय दिसेल.

4. आता ऑडिओ-व्हिडिओ कॉलिंग फिचर अ‍ॅक्टिव्हेट करा.

5. आता कॉल करण्यासाठी तुम्हाला DM ओपन करावे लागेल.

6. स्क्रीनवरून फोन आयकॉनवर टॅप करा आणि येथे ऑडिओ-व्हिडिओ कॉलपैकी एक निवडा.

नवीन फीचर फक्त प्रीमियम सब्सक्राइबर्ससाठी आहे. फक्त ब्लू टिक वापरकर्ते ऑडिओ-व्हिडिओ कॉल करू शकतात. मात्र, प्रत्येकाला कॉल रिसिव्ह करण्याची सुविधा असेल. त्याच वेळी, जर तुम्हाला प्रत्येकाने तुम्हाला कॉल करू नये असे वाटत असेल तर कंपनीने यासाठी तीन पर्याय दिले आहेत. पहिले म्हणजे तुमच्या अ‍ॅड्रेस बुकमध्ये जोडलेले लोक, दुसरे- ज्यांचे तुम्ही फॉलो करता आणि तिसरे- वेरिफाइड वापरकर्ते. दरम्यान, X च्या या नवीन फीचरचा युजर्संना नक्की फायदा होऊ शकतो.

Oath Taking Ceremony: कोण होणार मुख्यमंत्री? वानखेडेवर भव्य शपथविधी सोहळा

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : महायुतीचा शपथविधी 25 तारखेला वानखेडे स्टेडियमवर होणार

Ulhasnagar Assembly Election 2024 Result: उल्हासनगरमध्ये ओमी कलानी यांचा पराभव करत कुमार आयलानी विजयी

Vasai Virar Vidhansabha: वसई-विरार, नालासोपाऱ्यात बविआला मोठा धक्का, क्षितिज ठाकूर यांचा दाणुन पराभव

महाविकास आघाडीला मोठा झटका, दिग्गजांचा पराभव