आज अर्थसंकल्प सादर करण्यात आले. या अर्थसंकल्पाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण आज 1 फेब्रुवारी 2024 रोजी अर्थसंकल्प सादर केला. मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील संसदेचे अखेरचे हे अधिवेशन होते. अर्थमंत्री निर्मला सितारमण या अर्थसंकल्पानंतर पत्रकार परिषद घेणार आहेत. अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन म्हणाले, सर्वसामान्यांच्या जीवनात बदल घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
तरुणांच्या सक्षमीकरणावरही काम केलं आहे. तीन हजार नवीन आयटीआय खुल्या करण्यात आल्या आहेत. तसेच 54 लाख तरुणांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय तरुणांनी घवघवीत यश संपादन केलं आहे. तसेच देशात सात नवे IIT आणि 7 नवे IIM आणि नवीन वैद्यकीय महाविद्यालये सुरु करणार असल्याचेही सांगण्यात आले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. तसेच आम्ही सामान्यांच्या हितासाठी काम करत आहोत असे म्हणत केंद्रीय अर्थमंत्र्यांनी सरकारच्या कामाचा लेखाजोखा मांडला. 2047 पर्यंत देश विकसित देशांच्या यादीत समावेश असेल असा दावा देखील यावेळी त्यांनी केला.