आजपासून काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. काँग्रेसला आता लवकरच नवीन अध्यक्ष मिळणार आहे. काँग्रेस अध्यक्षपदासाठी सध्या दोन नाव चर्चेत आहेत. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत काँग्रेस अध्यक्षपदासाठी निवडणूक लढवणार असल्याचं त्यांनी जाहिर केलं आहे. या घोषणेसोबतच अशोक गेहलोत यांनी आपण राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार असल्याचंही स्पष्ट केलं आहे.
काँग्रेस अध्यक्षपद मिळाल्यास मी राजस्थानचे मुख्यमंत्रीपद सोडणार आहे. त्यामुळे राजस्थानचा पुढचा मुख्यमंत्री कोण असेल याबाबतचा निर्णय सोनिया गांधी आणि प्रदेश प्रभारी ठरवतील असंही त्यांनी म्हटलंय. या अध्यक्ष पदासाठी काँग्रेस अध्यक्षपदासाठी यामध्ये पहिलं नाव आहे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि दुसरं नाव आहे शशी थरुर. ही दोन नावं सध्या चांगलीच चर्चेत आहेत.