महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर 5 न्यायमूर्तींच्या घटनापीठाकडे 21 फेब्रुवारीला पुन्हा सुनावणी होणार आहे. 21 फेब्रुवारीला इतर मुद्द्यावर कोर्टात युक्तीवाद केला जाणार आहे. रेबिया प्रकरणाच्या पात्रतेवर मंगळवारी सुनावणी होणार असल्याची माहिती मिळत आहे. सत्ता संघर्षाचे हे प्रकरण पाच न्यायमूर्तींकडेच राहणार असून या प्रकरणाची नियमित सुनावणी होणार आहे.
आज निकालाचे वाचन केले. यामध्ये नबाम रेबीया प्रकरणाच्या गुणवत्तेवर चर्चा करण्यात आली. त्यानंतर नबाम रेबियाचे प्रकरण सात न्यायमूर्तीकडे जाण्यासाठी पात्र नाही, त्यामुळे हे प्रकरण पाच न्यामूर्तींच्या खंडपीठकडे राहणार आहे. 21 आणि 22 फेब्रुवारीला याची नियमित सुनावणी होणार आहे. अशी माहिती मिळत आहे.