ताज्या बातम्या

PMLA : सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय, पीएमएलए कायद्यातील तरतुदी कायम राहणार

Supreme Court On ED : सुप्रीम कोर्टाने आज ईडीला मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने पीएमएलए कायद्याला आव्हान देणारी याचिका फेटाळली आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

आर्थिक घोटाळा प्रतिबंध कायद्यातील (PMLA) कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टाने ईडीला मोठा दिलासा दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायद्याला आव्हान देणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळाली आहे. ईडीकडून होत असलेल्या अटक, संपत्ती जप्त करण्याच्या कारवाईसही रोखण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिला आहे.

पीएमएलए कायद्यातील अटक आणि जप्ती संदर्भातील तरतुदींवर याचिकाकर्त्यांनी आक्षेप घेतला होता. यामध्ये पोलिस तक्रारीदरम्यान एफआयआर दाखल केला जातो तसा या कायद्यानुसार EIRC असतो. हा दाखवण्याआधीच याप्रकरणी आरोपीला अटक करण्याची तरतूद आहे. याविरोधात सुमारे अडीचशेपेक्षा अधिका याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या होत्या. पण सुप्रीम कोर्टानं याबाबत कोणत्याही बदलाचे संकेत न देता ईडीचे अधिकार सुरक्षित ठेवले आहेत.

दरम्यान, सन २०१९ मध्ये या कायद्यात जे बदल करण्यात आले होते ते देखील सुप्रीम कोर्टाने मान्य केले आहेत. म्हणजेच ईडीकडून सध्या ज्या प्रकारे कारवाईचा सपाटा सुरु आहे, त्यावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे.

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : सिल्लोडमध्ये मतमोजणी केंद्रावर मोठा गोंधळ; पोलिसांकडून लाठीचार्ज

Fadnavis on Vidhansabha Result: बावनकुळेंच्या अध्यक्षतेमुळे पक्ष जिवंत राहिला - फडणवीस

Oath Taking Ceremony: कोण होणार मुख्यमंत्री? वानखेडेवर भव्य शपथविधी सोहळा

Ulhasnagar Assembly Election 2024 Result: उल्हासनगरमध्ये ओमी कलानी यांचा पराभव करत कुमार आयलानी विजयी

Vasai Virar Vidhansabha: वसई-विरार, नालासोपाऱ्यात बविआला मोठा धक्का, क्षितिज ठाकूर यांचा दाणुन पराभव