ताज्या बातम्या

'दुटप्‍पी राजकीय भूमिकेचे उत्‍तम उदाहरण' कॉंग्रेसच्या जाहीरनाम्यावर सुनील तटकरेंची टीका

महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यावर सुनील तटकरेंची टीका, दुटप्‍पी राजकीय भूमिकेचे उत्‍तम उदाहरण म्हणून कॉंग्रेसच्या जाहीरनाम्याला विरोध

Published by : shweta walge

थोडक्यात

  1. १० नोव्हेंबर रोजी महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत झाली, ज्या वेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.

  2. जाहीरनाम्यावर विरोधकांनी प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली असून, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला "दुटप्पी राजकीय भूमिका" असे वर्णन केले.

  3. सुनील तटकरे यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला 'दुटप्पी' म्हणून टीका करत, याला उत्तम उदाहरण मानले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अश्यातच काल (रविवार, १० नोव्हेंबर) महाविकास आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद मुंबईत पार पडली. यावेळी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या उपस्थितीत महाविकास आघाडीचाजाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यालावर आता विरोधकांच्या प्रतिक्रिया यायला सुरुवात झाली. दुटप्‍पी राजकीय भूमिकेचे उत्‍तम उदाहरण म्‍हणजे कॉंग्रेसचा जाहीरनामा अशी टीका अजित पवारांच्‍या राष्‍ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्‍यक्ष सुनील तटकरे यांनी केलीय.

ते म्हणाले की,

दुटप्‍पी राजकीय भूमिकेचे उत्‍तम उदाहरण म्‍हणजे कॉंग्रेसचा जाहीरनामा. लाडकी बहीण योजनेवर टीका करणारे आणि ही योजना बंद करू म्‍हणणारे आता खोटं आश्‍वासन देत आहेत. कर्नाटकात ज्‍या योजना कॉंग्रेसने जाहीर केल्‍या होत्‍या त्‍या बंद पडण्‍याच्‍या मार्गावर आहेत, तिथला विकास थांबलाय. या फोल जाहीरनाम्‍याला जनता प्रतिसाद देणार नाही, असं तटकरे म्‍हणाले.

काँग्रेसचा जाहीरनाम्यात काय?

  • महिलांना वर्षाला ६ सिलेंडर ५०० रुपयात मिळणार

  • महिला अत्याचाराला आळा घालण्यासाठी शक्ती कायदा आणणार

  • ३०० युनिट पर्यंत वीजवापर असणा-या ग्राहकांना १०० युनिट मोफत वीज,

  • नवीन औद्योगिक धोरणात रोजगार निर्मितीवर भर

  • सरकारच्या विविध विभागातील रिक्त २.५ लाख जागा भरणार

  • एमपीएससीच्या माध्यमातून नोकर भरती करणार

  • सरकारी नोकऱ्यातील कंत्राटी भरती पद्धत बंद करणार

  • सरकारी विभागातील जागांचा अनुषेश भरून काढणार

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे वेळापत्रक ठरवून निवडणुका घेणार

  • महाराष्ट्राच्या विकासासाठी कृषी, ग्रामविकास, उद्योग, रोजगार, शहरी विकास, जनकल्याण यावर भर

  • महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे इंदू मिलमधील स्मारकाचे काम पूर्ण करणार

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर कॉरिडॉर बनवणार

  • शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचाराचे सरकार स्थापन करून २०३० पर्यंत समृद्ध महाराष्ट्र बनवण्याचा संकल्प

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी