Sanjay Raut Team Lokshahi
ताज्या बातम्या

"भाजपच्या भ्रष्टाचाराची विक्रांत फाईल तपासायला हवी"

सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्यांवरती जोरदार टीका

Published by : Shweta Chavan-Zagade

देशात अण्णा हजारे (Anna Hazare) किंवा भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवणारे कोणी शिल्लक असतील, तर त्यांनी भाजपच्या (BJP) भ्रष्टाचाराची विक्रांत फाईल (Vikrant file) तपासायला हवी. बांग्लादेशच्या (Bangladesh) युद्धात भारताला विजय मिळवून देणाऱ्या या युद्धनौकेचेही भाजपचे महात्मा किरीट सोमय्या (Kirit Somaiya) व त्यांच्या मुलाने कशा प्रकारे शोषण केले आहे ते बाहेर येईल. ज्यावेळी विक्रांत युद्धनौका हिंदुस्थानच्या नौदलातून निवृत्त व्हायची वेळ आली होती. त्यावेळी सैन्यदलासह देश सुध्दा हळहळला होता. त्यादरम्यान किरीट सोमय्या यांनी लोकवर्गणीतून युद्धनौकेसाठी आवश्यक असलेला निधी जमा करू असं जाहीर केलं. मुंबईसह महाराष्ट्रातून आणि व्यापाऱ्याकडून मोठा निधी जमा केला. जमा केलेल्या पैश्यांचं काय केलं असा प्रश्न सामनाच्या अग्रलेखातून किरीट सोमय्या यांच्यावरती करण्यात आली आहे.

तसेच जमा केलेला निधी राजभवनाच्या खात्यात जमा करणं आवश्यक होतं. पण डब्यांमधून जमा केलेला निधी गेला कुठे ? राजभवनाच्या खात्यात पैसे जमा न झाल्याचे राज्यपालांनी कळविले आहे. त्यामुळे किरीट सोमय्या आणि नील सोमय्या यांनी घोटाळा केल्याचे समोर आले आहे. किरीट सोमय्यांनी केलेला घोटाळा जाहीर असताना सुध्दा भाजपच्या महाराष्ट्रातल्या नेते त्यांची पाठीराखण करीत असल्याचं दिसतं आहे. आता किरीट सोमय्यांच्या मागे ईडीचा ससेमिरा लावणार काय असा सवाल सामनाच्या अग्रलेखातून उपस्थित करण्यात आला आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी