काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरु झाली आहे. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही संपूर्ण भारत ही यात्रा होत आहे. देशभरात 3570 किमीचा प्रवास करत ही यात्रा संपणार आहे. भारत जोडो या यात्रेचे नेतृत्व राहुल गांधी करत असून आता सोनिया गांधीही या भारत जोडो यात्रेत सहभागी झाल्या आहेत. यामुळे काँग्रेस नेते व कार्यकर्त्यांमध्ये अधिकच उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले.
यावरुन काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल म्हणाले, “सोनिया गांधी या यात्रेत सहभागी झाल्या हा ऐतिहासिक क्षण आहे. यामुळे कर्नाटकात पक्षाला अधिक बळकटी येईल.” असे सांगितले. कर्नाटकातील मांड्या येथे सोनिया गांधींनी आज भारत जोडो यात्रेत सहभाग घेतला. पदयात्रा संध्याकाळी सातवाजता नागमंगळा तालुक्यात संपणार आहे. या पदयात्रेनंतर ब्रम्ह्मदेवराहल्ली गावात सभा होणार आहे.