भाजप नेत्या आणि अभिनेत्री सोनाली फोगट (Sonali Phogat ) हिचं सोमवारी रात्री गोव्यात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. 41 वर्षीय सोनालीची प्रकृती सोमवारीच बिघडायला लागली होती. ज्याची माहिती तिने आपल्या कर्मचाऱ्यांना दिली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात घेऊन गेल्याच्या नंतर तिथं त्यांना मृत घोषित करण्यात आले. सध्या तिचे पोस्टमॉर्टम सुरू आहे. सोनाली फोगट ही प्रसिद्ध टिकटॉक स्टार देखील होती. सोनाली फोगटचा जन्म 21 सप्टेंबर 1979 रोजी हरियाणातील फतेहाबाद येथील भट्टू कलान येथे झाला. तिचे मूळ गाव हिसार येथे आहे.
सोनाली फोगटचे लग्न संजय फोगटसोबत झाले होते. हिसार येथील एका फार्महाऊसमध्ये तिचा नवरा संशयास्पद मृतावस्थेत आढळून आला. त्यांना यशोधरा नावाची मुलगी देखील आहे. 2006 मध्ये करिअरला सुरुवात झाली असताना सोनाली फोगटने 2006 मध्ये अँकर म्हणून टीव्हीच्या दुनियेत पाऊल ठेवले. त्यांनी दूरदर्शनपासून सुरुवात केली. 2019 मध्ये ती द स्टोरी ऑफ बदमाजगढ या वेब सीरिजमध्येही दिसली होती. 2019 मध्येच ती हरियाणवी म्युझिक व्हिडिओ "गन आली जातनी" मध्ये दिसली होती. 2020 मध्ये तिने "अम्मा: अ मदर हू मेड लाख्स फॉर अम्मा" या टीव्ही मालिकेत नवाज शाहच्या पत्नीची भूमिका साकारली होती. बिग बॉस 14 या रिअॅलिटी शोमध्ये ती वाईल्ड कार्ड स्पर्धक होती.
2008 मध्ये सोनाली फोगटने भारतीय जनता पार्टी (BJP) मधून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात केली होती. तिला भाजप महिला मोर्चाच्या उपाध्यक्षा देखील बनवण्यात आले. 2019 मध्ये तिने आदमपूरमधून हरियाणा विधानसभा निवडणूक लढवली होती. पण काँग्रेसच्या कुलदीप बिश्नोई(Kuldeep Bishnoi) यांच्याकडून तिचा २९,७४१ मतांनी पराभव झाला. फोगट यांनी झारखंड आणि मध्य प्रदेशच्या आदिवासी भागातही भाजपसाठी काम केलेलं आहे. नंतर तिला हरियाणा नवी दिल्ली आणि चंदीगड येथे भाजपच्या अनुसूचित जमाती शाखेचे प्रभारी बनवण्यात आले होते.